हिरोईन नाही अॅक्ट्रेस म्हणुन काम करायचय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:59 IST2016-03-05T12:59:07+5:302016-03-05T05:59:07+5:30
चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणुन काम करण्याचे स्वप्न पाहणाºया अनेक मुली असतील. आपल्याला चांगल्या चित्रपटांमध्ये उत्तम भुमिका पडदयावर साकारायला मिळावी असे प्रत्येक अ

हिरोईन नाही अॅक्ट्रेस म्हणुन काम करायचय
सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मृण्मयी सांगते, तुम्ही हिरोईन म्हणुन वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंतच काम करु शकता. तुमच्या कामाला तेव्हा काही मर्यादा येतात. परंतू एक अॅक्ट्रेस म्हणुन वयाच्या ८०-९० वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अभिनय करु शकता आणि म्हणुनच मला हिरोईन नाही तर एक अॅक्ट्रेस म्हणुनच काम करायचय. माझ्या वयापेक्षा जास्त वयाचे रोल्स मला आले तरी मी अभिनय करीत राहणार मी भुमिकेला जास्त प्राधान्य देते. जोपर्यंत चांगले रोल्स येतील मी काम करेल. जर चांगल्या भुमिका नाही मिळाल्या तर घरी सुद्धा बसुन राहिल. त्यामुळे, मृण्मयीला चांगल्या भुमिका साकारायला मिळूदेत अशीच अपेक्षा आता तिचे चाहते नक्कीच करतील.