शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

हिपॅटॅटिस. या जीवघेण्या आजाराशी या भाज्या करू शकतात दोन हात. मग त्यांचा समावेश रोजच्या जेवणात कराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 18:57 IST

हिपॅटॅटिसला विरोध करणार्या, त्याला काबूत ठेवू शकणार्या अनेक भाज्या आहेत ज्याचा समावेश आपण अगदी सहजपणे आपल्या रोजच्या आहारात करू शकतो.

ठळक मुद्दे* गाजराचा समावेश रोजच्या आहारात केला तर यकृताचं कार्य व्यवस्थित चालू राहातं.* बीट शिजवून खाण्यापेक्षा कच्चं खाणं किंवा रस स्वरूपात सेवन करणं यकृतासाठी उपयुक्त असतं.* पालकमुळे यकृतातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात.

- माधुरी पेठकरहिपॅटॅटिस अर्थात यकृत दाह. हा जीवघेणा आजार आहे. यकृताला विषाणूंचा संसर्ग होवून हा आजार होतो. हा काही फक्त भारतात आढळणारा आजार नसून या आजारानं जगभरात धुडगूस घातला आहे. त्यामुळेच 28 जुलै हा ‘वर्ल्ड हिपॅटॅटिस डे’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या आजाराची लागण होवू नये म्हणून आहारापासून औषधापर्यंत, उपायापासून काळजी घेण्यापर्यंत ज्या गोष्टी करता येतील त्यासंबंधीच्या माहितीचा प्रचार आज जगभरातून केला जात आहे. उद्देश हाच की या जीवघेण्या आजारापासून प्रत्येकाचं रक्षण व्हावं.हा आजार आपल्यापासून दहा हात दूर राहावा यासाठीची काळजी आपण आपल्या आहारातूनही घेवू शकतो. हिपॅटॅटिसला विरोध करणार्या, त्याला काबूत ठेवू शकणार्या अनेक भाज्या आहेत ज्याचा समावेश आपण अगदी सहजपणे आपल्या रोजच्या आहारात करू शकतो.

 

या भाज्या नियमित खा1) गाजर- गाजरात मोठ्या प्रमाणात ग्लुटाथिआॅन नावाचं प्रथिनं असतं. त्याचप्रमाणे गाजरात मोठ्या प्रमाणात बिटा केरोटिन आणि प्लान्ट फ्लेव्होनिडस नावाचे महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे गाजराचा समावेश रोजच्या आहारात केला तर यकृताचं कार्य व्यवस्थित चालू राहातं.

2 ) टमाटे- टमाट्यात ग्लुटाथिआॅन सोबतच अ‍ॅण्टिआॅक्सिडंटही मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक यकृत स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात टमाटा असणंही आवश्यक आहे.

3) बीट- गाजराप्रमाणे बीटामध्येही प्लान्ट फ्लेव्होनिडस, बिटा केरोटिन हे घटक असतात. यकृताचं काम योग्य प्रकारे चालण्यास बीट मदत करतं. बीट शिजवून खाण्यापेक्षा कच्चं खाणं किंवा रस स्वरूपात सेवन करणं यकृतासाठी उपयुक्त असतं.

 

4) पालक- पालक म्हणजे शरीराची स्वच्छता दूतच. पालकात क्लोरोफिल नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील विषारी घटक शोषून घ्यायला मदत करतो. पालकाच्या सेवनानं पित्त यकृतात साठून राहात नाही. पालकमुळे यकृतातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात.

5) लसूण- लसणासारख्या उग्र घटकामध्ये एन्झाइम्स असतात. लसणामध्ये अ‍ॅलिसिन आणि सेलेनियम हे घटक आहेत जे बांधांच काम करतात. हे घटक यकृताचं विषारी घटकांपासून संरक्षण करतं. लसूण स्वयंपाकात शिजवून खाता येतो तसाच कच्चाही खाता येतो. लसूण कोलेस्टेरॉल कमी करतो.

 

6) ब्रोकोली- ही भाजी वरचेवर आहारात असणं गरजेचं आहे. ब्रोकोली ग्लुकोसिनोलेट या नैसर्गिक घटकाची निर्मिती शरीरात करतं. या घटकामुळे यकृतातील कार्सिनोजन्ससारखे विषारी घटक शरीराबाहेर पडतात.

या भाज्या नियमित आहारात घेतल्या तरी आपण आपल्या पातळीवर हिपॅटॅटिस सारख्या जीवघेण्या आजाराचा बंदोबस्त करू शकतो.