बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि धावपळीचे आयुष्य यांमुळे सगळ्यात कॉमन जाणवणारी समस्या म्हणजे ब्लोटींग म्हणजेच पोट फुगण्याची समस्या. सर्वसामान्यपणे जेवल्यानंतर पोट फुगलेलं असतं किंवा सुज येते. त्यामुळे जीव घाबराघुबरा होतो. असा त्रास उद्भवल्यानंतर तुम्ही तुमचं रोजचं काम व्यवस्थीत करू शकतं नाही. काहीवेळा पोट फुगणे हे नॉर्मल असतं. पण जर हीच समस्या जास्त वेळ राहिली आणि सतत उद्भवत असेल तर गंभीर आजाराचे संकेत सुद्धा असु शकतात.
जेव्हा आपल्या शरीरातील पचनक्रिया आणि मासपेशींच्या हालचालींमध्ये समस्या निर्माण होते किंवा प्रमाणापेक्षा जास्त गॅस झाला असेल तर पोट फुगतं. या अवस्थेला ब्लोटींग असं म्हणतात. यामुळे पोटात टाईटनेस सुद्धा वाटत असतो. अनियमीत खाण्यापिण्याच्या वेळा, प्रदुषण यांमुळे ही समस्या उद्भवू शकते. त्यासाठी जेवण चावून खाणं महत्वाचं आहे. तसंच जास्त कार्बोहायट्रेस आणि फॅट्स असलेल्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे पोट फुगण्याची समस्या जाणवत असते.
या आजारांमुळे पोटात येते सुज
जर पोट फुगण्याची समस्या उद्भवल्यानंतर अचानक तुमचं वजन कमी व्हायला सुरूवात झाली तर ट्यूमर सुद्धा असू शकतो.
पोट फुगल्यानंतर तर अचानकपणे वजन वाढायला लागलं तर तुम्हाला लिव्हरशी संबंधित आजार असण्याची शक्यता असते.
पोट फुगण्यासोबतच हार्ड स्टुल किंवा ब्लिडींग होत असेल तर युट्रस कॅन्सर सुद्धा असु शकतो. हिपॅटिटिस बी सुद्धा असु शकतो.
पोट फुगल्यानंतर तुम्हाला उलटी होत असेल तर त्याचसोबत तोंडात फोड आणि सांधेदुखीची समस्या उद्भवत असेल तर कोलोनची संबंधीत आजार होण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या नेहमी जाणवत असेल फिटनेस एक्सपर्ट आणि न्युट्रिशनिस्ट यांनी आयुर्वेदिक ड्रिंकबद्दल सांगितलं आहे. या ड्रिंकचे नियमीत सेवन केल्याने ब्लॉटींगची समस्या दूर होऊ शकते. हे ड्रिंक तयार करण्यासाठी इसबगोल आणि एपल सिडर व्हिनेगर यांचा वापर करावा लागेल. ( हे पण वाचा-२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!)
१ ग्लास पाण्यात १ चमचा इसबगोल आणि २ चमचे एपल सिडर व्हिनेगर घाला. या मिश्रणाला चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या जेवणाच्या आधी या ड्रिंकचे सेवन करा. पोटात गॅस होण्याची समस्या सुद्धा दूर होते. शरीरासाठी फायदेशीर असं हे ड्रिंक आहे. ( हे पण वाचा-मुलं परीक्षेचं टेंशन घेत असतील, तर सेलिब्रिटींचे 'हे' अनुभव नक्कीच उपयोगी येतील...)