शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सावधान! हिवाळ्यात अधिक वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:11 IST

Heart Attack In Winter : हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

Heart Attack In Winter : हिवाळा हा तसा आरोग्यासाठी खूप फायदेशीर सीझन मानला जातो. कारण या दिवसात अनेक पौष्टिक गोष्टींचं सेवन केलं जातं. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. मात्र, या दिवसात इम्यूनिटी कमजोर होते. अशात वेगवेगळ्या आजारांचा आणि इन्फेक्शनचाही धोका असतो. त्याहून एक महत्वाची बाब म्हणजे हिवाळ्यात अनेकांना हार्ट अटॅकचाही धोका असतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

हिवाळ्यात बॉडी टेम्प्रेचर कमी झाल्याने आपलं सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे हार्ट रेट, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया वाढू शकते. या सर्व गोष्टींमुळे हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो.

तसेच एक्सपर्ट सांगतात की, हिवाळ्यात हृदयात अनेक बदल होतात. हार्मोन्सची लेव्हल वाढते. घाम कमी येतो आणि सॉल्ट लॉसही कमी होतो. रक्त घट्ट होतं ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. खासकरून जास्त थंडी असल्यावर ब्लड प्रेशर वाढणे आणि हृदयाच्या धमण्या आकुंचन पावल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशात एक्सपर्टनी हिवाळ्यात हृदय फिट ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. तसेच हिवाळ्यात हार्ट अटॅकची लक्षणं काय दिसतात तेही जाणून घेऊ.

हिवाळ्यात हार्ट अटॅकची लक्षणं

- छातीमध्ये दबाव, वेदना सतत होणं हे हार्ट अटॅकचं लक्षणं असू शकतो.

- सतत शरीरात वेदना किंवा अस्वस्थता, हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात वेदना होणे

- श्वास घेण्यास समस्या, छातीत दबाव

- जास्त घाम येणे, ज्याला सामान्यपणे  'cold sweat' म्हटलं जातं

- कधी कधी विनाकारण मळमळ किंवा उलटी जाणवणे

- अचानक खूप जास्त थकवा किंवा कमजोरी येणे

- चक्कर येणे किंवा डोकं फिरणे, बेशुद्ध पडणे

हार्ट अटॅकपासून बचावाच्या टिप्स

स्ट्रेस घेऊ नका

हार्ट अटॅक आणि हृदयासंबंधी आजारांचं मुख्य कारण स्ट्रेस असतो. एक्यूट स्ट्रेसमुळे थेट हार्ट अटॅक येऊ शकतो आणि  क्रोनिक स्ट्रेसने हृदयाच्या धमण्यांच्या आतील थरात बदल होऊ शकतो. ज्याने सूज येऊ शकते, ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात आणि सोबतच हार्ट अटॅकही येऊ शकतो.

आवडीचं काम करा

गार्डनिंग, पेंटिंग, रीडिंग आणि म्युझिक ऐकल्याने तणाव कमी केला जाऊ शकतो. तुम्ही योगा आणि मेडिटेशनही करू शकता. याने तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यास बराच फायदा होऊ शकतो.

भरपूर झोप घ्या

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणं फार गरजेचं असं. सोबतच काम करताना मधे मधे ब्रेक घेत रहा. भरपूर झोप याचा अर्थ ८ तासांपेक्षा जास्त झोप नाही. दिवसातून ७ ते ८ तास झोप शरीरासाठी गरजेची असते. पण त्यापेक्षा जास्त वेळ झोपाल तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.

रोज एक्सरसाइज करा

दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे एक्सरसाइज करा. हिवाळ्यात घराबाहेर एक्सरसाइज करणं टाळा. कारण बाहेर थंडी जास्त असते. अशात तुम्ही योग्यप्रकारे एक्सरसाइज करू शकणार नाही. तुम्ही सायकलिंग, ट्रेडमिल, योगासारखे इनडोर एक्सरसाइज करू शकता.

मीठ आणि साखर कमी खा

आहारात सूर्यफूलाचं तेल किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करा. हे पॉलअनसॅचुरेटेड असतात. आपल्या रोजच्या आहारात सलाद आणि फळांचा समावेश करा. जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ खावीत. फास्ट फूडपासून दूर रहा.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी