सावधान! लहान मुलांनाही येऊ शकतो हार्ट अटॅक, 'हे' उपाय कराल तर टाळता येईल मोठा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 01:38 PM2024-03-26T13:38:50+5:302024-03-26T13:39:17+5:30

Heart Attack in Kids : अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोकांना कमी वयातच हार्ट अटॅक येऊ लागले आहेत.

Heart attack in kids : Know reason symptoms and prevention | सावधान! लहान मुलांनाही येऊ शकतो हार्ट अटॅक, 'हे' उपाय कराल तर टाळता येईल मोठा धोका!

सावधान! लहान मुलांनाही येऊ शकतो हार्ट अटॅक, 'हे' उपाय कराल तर टाळता येईल मोठा धोका!

Heart Attack in Kids : जगात हार्ट अटॅकने जीव जाणाऱ्या लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. आधी हार्ट अटॅक किंवा हृदयरोग हे केवळ वय झालेल्या लोकांनाच होत होते. पण अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोकांना कमी वयातच हार्ट अटॅक येऊ लागले आहेत. याची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसात बघायला मिळालीत. आता तर लहान मुलेही हार्ट अटॅकचे शिकार होत आहेत.

काही महिन्यांआधीच गुजरात-तेलंगणामध्ये 15 वयापेक्षा लहान मुलांना हार्ट अटॅक (Heart Attack in Kids) आला. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट्सनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अशात लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकच्या केसेस का वाढत आहेत आणि यापासून कसा बचाव करावा हे आज जाणून घेऊया.

लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याची कारणे

डॉक्टरांनुसार, काही मुलांना जन्मापासूनच हृदयरोग असतो. आईच्या गर्भातच बाळ कंजेनायटल हार्ट डिजीजचे शिकार होतात. यांच्या हृदयात छिद्र आणि हार्ट डिजीज आढळतात. यामुळे बाळांचे हार्ट वॉल्व आणि वेसल्सवर नकारात्मक प्रभाव पडतो. पालकांना याबाबत काही कळत नाही की, त्यांच्या बाळाला गंभीर आजार आहे.

लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं कारण

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे वाढता लठ्ठपणा आहे. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. ज्यामुळे हृदयरोग वाढत आहे. तसेच आजकाल लहान मुले बाहेर म्हणजे मैदानात कमी खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव वाढत आहे. ज्यामुळे त्यांचा बीपी वाढत आहे आणि हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे.

लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षण

1) ओठांजवळ निळे डाग

2) श्वास घेण्यास समस्या

3) थोडं चाललं तरी श्वास भरून येणं

4) योग्यपणे विकास न होणं

5) चक्कर येणे, छातीत वेदना

काय करावे उपाय

- जर मुलांच्या छातीत वेदना आणि श्वास घेण्यास समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

- जन्मावेळी बाळाच्या हृदयाच्या सगळ्या टेस्ट करून घ्या.

- लहान मुलांना जंक फूड खाऊ देऊ नका.

- लहान मुलांची लाइफस्टाईल हेल्दी ठेवा.

- लहान मुलांना बाहेर किंवा मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहित करा.

Web Title: Heart attack in kids : Know reason symptoms and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.