शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अनेकांना माहीत नसतील पेरूच्या पानांचे 'हे' आरोग्यादायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 1:08 PM

पेरू म्हणजे सर्वांच्याच आवडीचं फळं. तिखट मीठ लावून खाल्लेल्या पेरूची बात काही औरच... पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे पेरूची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

पेरू म्हणजे सर्वांच्याच आवडीचं फळं. तिखट मीठ लावून खाल्लेल्या पेरूची बात काही औरच... पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे पेरूची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही ही पानं अत्यंत लाभदायक ठरतात. वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासोबतच पोटाच्या समस्या दूर राहण्यासाठीही मदत करतात. तसेच शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी जालं असेल तर ती दूर करण्याचेही काम पेरूची पानं करतात. जाणून घेऊया पेरूच्या पानांच्या फायद्यांबाबत...

(Image Credit : Asian Voice)

- पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून दातांवर लावल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. 

- केसांसाठी पेरूची पानं अत्यंत फायदेशीर ठरतात. या पानांमध्ये केसांसाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे केसांच्या वाढिसाठी उपयोगी ठरतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन-सी अधिक असतं. तसेच पेरूच्या पानांमध्ये आयर्नही असतं. जे केसांच्या वाढिसाठी उपयोगी ठरतं. 

- तुमचे केस गळत असतील तर त्यावर उपाय म्हणून या पानांचा वापर करू शकता. या पानांच्या मदतीने एक काढा तयार करून त्याने केसांच्या मुळाजवळ मालिश करा.- अनेकदा विविध कारणांनी शरीराच्या अनेक भागांमध्ये गाठी तयार होतात. यातील अनेक गाठी वेदनादायी असतात तर काही न दुखणाऱ्या. असा गाठींवर जर पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून लावली तर त्याचा फायदा होतो. - काहींना महिलांना अंगावरून पांढरं जाण्याची समस्या होते. अनेकदा शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेमुळेही हा त्रास होत असतो. परंतु हे प्रमाण वाढू लागल्यास त्यावर वेळीच उपचार करणं फायदेशीर ठरतं. पेरूची पानं या समस्येवर उपयोगी ठरतात. दररोज संध्याकाळी या पानांचा रस घेतल्याने या समस्या कमी होण्यास मदत होते. 

- पिंपल्स दूर करण्यासाठी पेरूची पानंही उपयोगी ठरतात. या पानांमध्ये अॅन्टीबॅक्टेरिअल आणि जलनरोधी गुणधर्म असतात. ज्याच्या मदतीने त्वचेच्या समस्या म्हणजेच, अॅक्ने, पूरळ, अॅलर्जी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

- डायरियाच्या आजारांवर पेरूची पानं उपयुक्त ठरतात. लहान मुलांना डायरिया झाल्यास या पांनाचा रस गुणकारी ठरतो.  पोटाच्या इतर समस्यांवर याचा उपयोग होतो. एक कप पाण्यामध्ये ही पानं टाकून पाणी उकळवून घ्यावं. तसेच हे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. 

-  वजन कमी करण्यासाठी पेरूची पानं उपयुक्त ठरतात. शरीरातील फॅट नियंत्रणात ठेवण्यासाठी या पानांमध्ये असणारे गुणधर्म मदत करतात. पेरूची पानं सुकवून त्याची पावडर करून ठेवा. पाण्यामध्ये एकत्र करून घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

टीप : प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. अनेकांना काही गोष्टींची अॅलर्जी असते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य