शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 12:18 IST

Idiot Syndrome : इंटरनेटवर आपल्या आजाराचे निदान करण्याच्या सवयीमुळे लोक "इडियट सिंड्रोम" चे बळी होऊ शकतात. गेल्या काही काळापासून या अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सिंड्रोमबद्दल सर्व काही जाणून घेऊया...

आजकाल लोकांमध्ये इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. प्रत्येक लहान-मोठ्या माहितीसाठी लोक आधी इंटरनेटची मदत घेतात. एवढंच नाही तर लोक त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. सध्या तर अनेक जण इंटरनेटलाच आपला डॉक्टर मानतात आणि त्यांच्या तब्येतीत कोणताही बदल जाणवल्यास ते डॉक्टरांऐवजी इंटरनेटकडे वळतात.

अशा प्रकारची सवय आता तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. इंटरनेटवर आपल्या आजाराचे निदान करण्याच्या सवयीमुळे लोक "इडियट सिंड्रोम" चे बळी होऊ शकतात. गेल्या काही काळापासून या अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या सिंड्रोमबद्दल सर्व काही जाणून घेऊया...

इडियट सिंड्रोम म्हणजे नेमकं काय?

IDIOT म्हणजे इंटरनेट डिराइव्ड इंफॉर्मेशन ऑब्सट्रक्शन ट्रीटमेंट. ही अशी स्थिती आहे जिथे सहज उपलब्ध होणारी माहिती योग्य वैद्यकीय उपचारांमध्ये अडथळा आणते इंटरनेट सर्चच्या आधारे रोगाचे स्वतःहून निदान केलं जातं, ज्यामुळे एकतर योग्य उपचार मिळत नाहीत किंवा स्वतःवर उपचार करून घातक परिणाम भोगावे लागतात.

मात्र याचा अर्थ असा नाही की इंटरनेट तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये उपयुक्त ठरू शकत नाही. चांगल्या आणि विश्वासार्ह वैद्यकीय वेबसाइट्स आणि ऑनलाइन सपोर्ट ग्रुप तुम्हाला महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती देऊ शकतं. जेव्हा तुम्ही इंटरनेटवर क्विक सर्चच्या रिझल्टला एक योग्य मेडिकल डायग्नोसिस मानता तेव्हा धोका असतो.

WHO काय म्हणते?

डब्ल्यूएचओ याला "इन्फोडेमिक" म्हणते. याने आरोग्य सेवेमध्ये एक कठीण परिस्थिती निर्माण केली आहे, कारण रोगाच्या प्रादुर्भावाच्या वेळी डिजिटल आणि फिजिकल वातावरणात खूप जास्त माहिती तयार केली आहे आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर अविश्वास निर्माण झाला आहे.

या सिंड्रोमचा लोकांवर कसा होतो परिणाम?

IDIOT सिंड्रोमचे मानसिक परिणाम गंभीर असतात. यामुळे अशी मानसिकता निर्माण होऊ शकते ज्यामध्ये रुग्ण औषध आणि डॉक्टरांवर अविश्वास ठेवू लागतात आणि स्वतःवर उपचार करणे निवडतात. ही विचारसरणी आणि सवय आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या उपचारात अडथळा आणू शकते, ज्यामुळे रुग्णाची स्थिती गंभीरपणे बिघडू शकते.

इडियट सिंड्रोमचे नकारात्मक प्रभाव

- जरी इंटरनेट हे आरोग्यविषयक माहितीचा खजिना असू शकते, तरीही तुम्ही तुमच्या लक्षणांबद्दल सतत माहिती शोधत असाल तर त्यामुळे चिंता आणि तणाव निर्माण होऊ शकतो.- सायबरकॉन्ड्रिया किंवा आयडीओटी सिंड्रोम, तुम्हाला लक्षणांची चुकीची माहिती देईल. त्यामुळे तुम्हाला गंभीर आजार झालाय असं तुम्ही समजू लागाल पण प्रत्यक्षात तसं काही नाही. - तुम्हाला ऑनलाइन काय सापडेल या भीतीमुळे तुम्ही वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करू शकता किंवा टाळू शकता, जे लवकर निदान आणि उपचारांसाठी महत्त्वाचे असू शकते.- सायबरकॉन्ड्रिया तुम्हाला ऑनलाइन माहितीवर आधारित औषधे थांबवण्यास किंवा बदलण्यास प्रवृत्त करू शकते, जे धोकादायक असू शकतं आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सInternetइंटरनेट