शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी नाश्त्यात या गोष्टींचे करु नका सेवन, आरोग्यासाठी ठरेल नुकसानकारक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:53 IST

Breakfast Tips : नाश्ता आणखी आरोग्यदायी तेव्हा होईल जेव्हा तुम्ही योग्य पदार्थांचा नाश्त्यात समावेश कराल. नाश्ता म्हणून खाल्लेले काही पदार्थ हे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. चला जाणून घेऊया नाश्त्यात काय असू नये... 

Breakfast Tips : सकाळी नाश्ता करणं चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. दिवसभराच्या एनर्जीसाठी आणि ऊर्जेसाठी पोटभर नाश्ता आवश्यक असतो. त्यामुळेच डॉक्टर रोज सकाळी नाश्ता करण्याचा सल्ला देतात. हा नाश्ता आणखी आरोग्यदायी तेव्हा होईल जेव्हा तुम्ही योग्य पदार्थांचा नाश्त्यात समावेश कराल. नाश्ता म्हणून खाल्लेले काही पदार्थ हे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. चला जाणून घेऊया नाश्त्यात काय असू नये... 

1) वजन कमी करायचं असेल तर खाऊ नका इडली-ढोकळा

दक्षिण भारतासह देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये इडली सांभर नाश्त्याला आवडीने खातात. सोबतच ढोकळाही खाल्ला जातो. हा नाश्ता चांगलाच हेल्दी मानला जातो. पण सतत हा नाश्ता केल्याने वजन वाढण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे रोज हेच पदार्थ नाश्त्यात खाऊ नये.

2) असे खा अंडे आणि दही

सकाळी नाश्त्यात मसालेदार मांस खाण्यापेक्षा अंडे खाणे अधिक फायद्याचे ठरते. कारण अंड्यात सोडियमचं प्रमाण कमी असतं. नाश्त्यात दही खाणेही फायदेशीर आहे. पण ते दही मलाईच्या दूधापासून तयार केलेलं नसावं. 

3) कॉफी

सकाळी सकाळी नाश्ता करताना कॉफी प्यायल्यास भूक कमी होते. कोल्ड कॉफीही हॉट कॉफीपेक्षा जास्त नुकसानदायक आहे. कारण यात शूगर आणि क्रीम जास्त असतं. यामुळे कॅलरीज अधिक वाढण्याची शक्यता असते. 

4) बर्गर खाणे टाळा

अलिकडे अनेक विदेशी कंपन्यांच्या बर्गरचा नाश्ता केला जातो. बर्गर परदेशात मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. पण या नाश्त्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणात वजन वाढण्याची समस्या भेडसावत आहे. हीच समस्या तुम्हालाही होऊ शकते. 

5) नाश्त्याला फ्रिजमध्ये ठेवलेलं खाऊ नका

अनेकदा काही लोक सकाळचा नाश्ताही तयार करुन फ्रिजमध्ये ठेवतात आणि सकाळी उठून खातात. पण असे करणे आपल्या शरीरासाठी नुकसानदायक आहे. इतकेच काय तर फ्रिजमध्ये ठेवलेली फळेही खाण्याआधी 1 तासांपूर्वी बाहेत काढून ठेवावीत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य