शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवून बसणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:54 IST

Health Tips : सोसायटी फॉर अल्जायमर अॅन्ड एजिंग रिसर्चचे जनरल सेक्रेटरी धिकव सांगतात की, मागच्या खिशात ठेवलेलं वजनी, जाडजूड पाकीट तुमच्या हिप जॉईंट आणि कमरेच्या खालच्या भागात त्रास निर्माण करु शकतं.

Health Tips : ज्याचं पाकीट जितकं जास्त मोठं तितका तो व्यक्ती मोठा असणार, असे मानले जाते. अनेकजण छोट्याशा पाकिटात पैशांसोबत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हिजिटींग कार्ड, लायसन्स, आयडी प्रूफ आणि इतरही काही गोष्टी ठेवतात. पण या इतक्या गोष्टी ठेवून तुम्ही अनेक अडचणींना निमंत्रण देताय. डॉक्टरांनुसार तुमच्या पॅंटच्या मागच्या खिशात आरामात ठेवलेल्या या पाकिटामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

1) सोसायटी फॉर अल्जायमर अॅन्ड एजिंग रिसर्चचे जनरल सेक्रेटरी धिकव सांगतात की, मागच्या खिशात ठेवलेलं वजनी, जाडजूड पाकीट तुमच्या हिप जॉईंट आणि कमरेच्या खालच्या भागात त्रास निर्माण करु शकतं. कमरेत एक सायटीका नावाची नस असते. जेव्हा आपण हे जाड पाकीट मागच्या खिशात ठेवून बसतो, तेव्हा सायटीका नस दबली जाते. ही नस दबली गेल्याने हिप जॉईंट आणि कमरेच्या खाली दुखणं सुरु होतं. 

2) रोज याप्रकारचं दुखणं होत असेल तर याला पिरीफोर्मिंस सिंड्रोम म्हटले जाते. मागच्या खिशात जाड पाकीट ठेवल्याने तुमचा पार्श्वभाग एका बाजूला झुकला जातो. त्यामुळे तुमच्या पाठिच्या कण्यावर अधिक भार पडतो. सरळ बसण्याऐवजी कमरेच्या खालचा भाग इंद्रधनुष सारका वाकडा बनतो. याने पाठिचा कणाही वाकडा होऊ शकतो. असे झाले तर हे महागात पडू शकतं. 

3) डॉ. धिकव यांचं म्हणनं आहे की, याप्रकारच्या सर्वात जास्त समस्या या विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतात. विद्यार्थी 8-8 तास पाकीट खिशात ठेवून बसलेले असतात. आमच्याकडे याप्रकारचे 20 ते 25 रुग्ण येतात. 

4) कालरा हॉस्पिटलचे डॉ. आर.एन कालरा सांगतात की, ही समस्या तरुण, वजन जास्त असलेल्या आणि जास्त वेळ बसून राहणाऱ्यांमध्ये आढळते. ही समस्या असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. वेळेवर यावर उपचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही पाकीट मागच्या खिशात टाकून न बसण्याचा सल्ला देत असतो. 

काय घ्याल काळजी?

मागच्या खिशात पाकीट ठेवून जास्त वेळ बसू नका.

हिप स्ट्रेचिंगचा व्यायाम करा.

10 मिनिटांसाठी जागेवरुन उठून एकडे-तिकडे फेऱ्या मारा.

बसताना पाकीट बॅगमध्ये काढून ठेवा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य