शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' पदार्थांमुळे तुमची हाडे होतात कमजोर, जाणून घ्या काय खाणं-पिणं टाळावं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:03 IST

Bone density reduction : वेगवेगळ्या पदार्थांमधून असे काही तत्व आपल्या शरीरात जातात की, त्यांनी हाडे कमजोर होतात. चला जाणून घेऊ त्या तत्वांबाबत...

Bone density reduction : मजबूत हाडांसाठी आहारातून कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी घेण्याची गरज असते हे सर्वांना माहीत आहे. पण काही असेही पदार्थ आपल्या खाण्यात येतात ज्यांमुळे हाडे कमजोर होतात. वेगवेगळ्या पदार्थांमधून असे काही तत्व आपल्या शरीरात जातात की, त्यांनी हाडे कमजोर होतात. चला जाणून घेऊ त्या तत्वांबाबत...

सोडियमचं अधिक प्रमाण

मिठामुळे शरीरातील सोडियमचची कमतरता पूर्ण होते. पण जास्त सोडियन सुद्धा शरीरासाठी हानिकारक होऊ शकतं. सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे लघवीच्या मार्गातून कॅल्शिअम बाहेर जाऊ लागतं. त्यामुळे तुम्हाला जर हाडे निरोगी ठेवायची असेल तर आहारातून जास्त सोडियम सेवन करु नये. 

अल्कोहोलही नुकसानकारक

अल्कोहोलचं अधिक प्रमाण हे शरीरासाठी घातक आहे. अल्कोहोल जास्त सेवन केल्याने हाडांचं नुकसान होतं. याचा प्रभाव हाडांवर इतका पडतो की, थोडासा झटका लागला तरी हाडे तुटू शकतात. 

प्रोसेस्ड फूड

प्रोसेस्ड फूडही हाडांसाठी फार हानिकारक आहेत. कारण या पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं आणि जास्त सोडियम हाडांसाठी चांगलं नसतं. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या बंद पॅकेटमधील फूड सेवन करणे टाळा.

बेकरी फूडनेही होतं नुकसान

बेकरी फूड टेस्टसाठी जरी चांगले असले तर यात शुगर आणि अनेकप्रकारचे हानिकारक तत्व असतात. जे शरीरातील हाडांना पोषक तत्त्व देण्याऐवजी त्यांना कमजोर करतात. त्यामुळे हाडांची काळजी घ्यायची असेल तर बेकरी फूड कमी प्रमाणात सेवन करा. 

कार्बोनेटेड ड्रिंक

कार्बोनेटेड ड्रिंक प्यायला टेस्टी असतात पण याचे शरीरावर अनेक गंबीर परिणामही होतात. याने हाडांचं आरोग्य बाधित होतं. या ड्रिंकमध्ये फॉस्फोरसचं प्रमाण अधिक असतं. याने कॅल्शिअम हाडांमधून बाहेर निघतं आणि हाडे कमजोर होतात. 

व्हिटॅमिन ए

आपणा सर्वांना हे माहीत आहे की, आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन किती महत्त्वाचे आहेत. खासकरुन व्हिटॅमिन ए दात, हाडे, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फार गरजेचं असतं. व्हिटॅमिन ए हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे हे खरं असलं तरी व्हिटॅमिन ए जास्त झालं तर व्हिटॅमिन डी वर मात करुन हाडांना नुकसान पोहोचवू शकतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य