शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

'हा' असू शकतो High Blood Pressure चा प्राथमिक संकेत, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:22 IST

High blood pressure : हाय ब्लड प्रेशरच्या प्राथमिक स्थितीतील अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे सेन्सेशन होणे आणि त्यावेळी वेदना होणे. जर अशाप्रकारची समस्या जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 

High blood pressure :  हाय ब्लड प्रेशर फार कॉमन समस्या आहे, पण जास्तीत जास्त लोकांसाठी ही समस्या फार त्रासदायक ठरत आहे.  सर्वात धोकादायक बाब ही आहे की, जोपर्यंत लोक पूर्णपणे या समस्येच्या जाळ्यात अडकत नाहीत, तोपर्यंत त्यांना काही माहितही होत नाही. हाय ब्लड प्रेशरच्या प्राथमिक स्थितीतील अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे सेन्सेशन होणे आणि त्यावेळी वेदना होणे. जर अशाप्रकारची समस्या जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 

हाय ब्लड प्रेशर त्या समस्येला मानलं जातं, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आर्टरीजमध्ये ब्लडचंप्रेशर सामान्यापेक्षा अधिक राहतं. एक्सपर्टनुसार, यूकेमध्ये दररोज ४ पैकी १ व्यक्ती हाय ब्लड प्रेशरने पीडित आहे. पण लोकांना या आजाराची प्राथमिक काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे समस्या अधिक वाढते. पण हा आजार सुरूवातीच्या काळातच ओळखण्यासाठी किंवा याची माहिती घेण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे रोज तुमचा बीपी चेक करत रहावा.

बीपी चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरला भेटू शकता किंवा घरीच बीपी चेक करण्याचं उपकरण ठेवू शकता. पण अचानक डोकं दुखणे आणि त्यामुळे वेदना होणे हा सुद्धा हाय ब्लड प्रेशरचा प्राथमिक संकेत असू शकतो. जर डोकं अचानक जोरात दुखत असेल आणि सेन्सेशन किंवा शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरूवातीलाच या आजाराचा धोका ओळखून तुम्ही हा आजार अधिक गंभीर रूप घेण्याआधी रोखू शकता.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य