शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

'या' खास पाण्याने काही दिवसात होईल लिव्हरची सफाई, विषारी पदार्थ निघतील शरीरातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:15 IST

Liver detox drink : जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, धुम्रपान करणे आणि मद्यसेवन यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. 

Liver detox drink : शरीरातील अनेक महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर. रक्त शुद्ध करणं, अन्न पचनास मदत करणं, काही महत्वाचे तत्व रिलीज करण्याचं काम लिव्हर करतं. पण जर लिव्हरची योग्य काळजी घेतली नाही तर ते खराब होतं आणि याने शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. लिव्हर खराब होण्याची वेगवेगळी कारणे आहेत जसे की, जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, धुम्रपान करणे आणि मद्यसेवन यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. 

अशात लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. यातीलच एक आयुर्वेदिक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका खास पेयाचं सेवन करून तुम्ही कमीत कमी दिवसात लिव्हर डिटॉक्स करू शकता.  मनुके आणि त्याच्या पाण्याने लिव्हर डिटॉक्स केलं जाऊ शकतं. 

काय होतात या पाण्याचे फायदे?

मनुक्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात फायदेशीर असतात. तसेच यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवले तर याचे फायदे अधिक वाढतात. जर मनुक्याचं पाणी रोज सकाळी अनोशा पोटी सेवन केलं तर याने अनेक प्रकारचे फायदे होतात.

रेसिपी

हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी २ कप पाणी घ्या आणि १५० ग्रॅम मनुके घ्या. डार्क रंगाचे १५० ग्रॅम मनुके चांगले धुवून घ्या. २ कप पाणी उकडायला ठेवा आणि त्यात मनुके टाका. २० मिनिटे हे उकडू द्या. आता मनुके रात्रभर याच पाण्यात राहू द्या. सकाळी तुमचं ड्रिंक तयार होईल.

सेवन करण्याची पद्धत आणि वेळ?

सकाळी अनोशा पोटी नाश्त्याच्या अर्धा तासआधी हे पाणी सेवन करू शकता आणि त्याआधी या पाण्यातील मनुके वेगळे काढा. आता पाणी सेवन करू शकता. तसेच मनुके खाऊ शकता. केवळ ३ दिवस हा उपाय कराल तर लिव्हरमधील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जाती. याने लिव्हर पूर्णपणे साफ होईल. 

काय आहेत याचे फायदे?

- मनुक्याच्या पाण्यात असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने बॉडी सेल्स हेल्दी होऊन कॅन्सरचा धोका कमी होतो. मनुक्याच्या पाण्याने मेटाबॉलिज्म मजबूत करून फॅट बर्निंग प्रोसेज वाढते. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

- या पाण्यात अमिनो अ‍ॅसिड असतं जे एनर्जी देतं. याने थकवा आणि कमजोरी दूर होते. तसेच या पाण्यात व्हिटॅमिन ए, बीटा केरोटीन आणि डोळ्यांसाठी फायदेशीर फायटोन्यूट्रिएंट्स असतात. याने नजरेची कमजोरी दूर होते.

- या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते. तसेच मनुक्यातील सॉल्युबल फायबर पोटही साफ ठेवून गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देतं. मनुक्याच्या पाण्यात आयर्न, कॉपर आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. याने रक्ताची कमतरता दूर होऊ लाल रक्त पेशी हेल्दी होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य