शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Health Tips: दिवाळी झाली आता साखर कमी करण्याची सुरुवात करा चहाचे 'हे' पर्याय वापरून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 16:05 IST

Health Care tips: साखर कमी करायची म्हटली की आपल्याला दिवसभरात प्यायला जाणारा चहा आठवतो, त्याला पर्यायी हे प्रयोग करून बघा!

वजन कमी करणे असो किंवा मधुमेह, रक्तदाबावर नियंत्रण आणायचे असो, डॉक्टर त्याची सुरुवात चहा सोडा हे सांगण्यापासून करतात. एकतर दुधाने पित्ताशयाचा अर्थात ऍसिडिटीचा त्रास होतो आणि दुसरी बाब म्हणजे साखरेने वजन वाढते. काही जण कोरा चहा पितात. तरी त्यातून साखर पोटात जातेच. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून चहाचा हा प्रकार!

नित्याची सवय बनलेला चहा एकएक सोडणे शक्य होत नाही. त्याची सुरुवात करायची, तर आधी चहापानाच्या वेळेची संख्या कमी करावी. दिवसातून चार वेळा चहा घेत असाल तर सुरुवातीला, तीन, मग दोन, मग एक असे करत संख्येत घट करावी. नंतर नंतर चहाच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणून आले लिंबूचे पाचक जसे पाण्यातून घेतो, तसाच आल्याचा अर्क आणि लिंबाचा रस वापरून त्यात पुढील घटकांचा समावेश करावा.  

साहित्य:अडीच कप पाणी२ टी बॅग्स/ चहा पावडर २ ते ३ चमचे मधलिंबाच्या २ चकत्या१/२ इंच आलं

कृती:१) आल्याच्या पातळ चकत्या कराव्यात.२) पातेल्यात पाणी घेउन त्यात आल्याच्या चकत्या घालाव्यात. उकळून घ्यावे.३) कपमध्ये ओतून त्यात मध मिक्स करावा. कपात प्रत्येकी एक लिंबाची चकती आणि टी बॅग घालावी किंवा चहा पावडर टाकून एक उकळी काढावी आणि चहा गाळून घ्यावा. ४) चमच्याने ढवळून कोमटसर चहा प्यावा.५) यामध्ये पुदिन्याची किंवा तुळशीची पाने पाण्यात उकळताना घालू शकता. त्याची चव छान लागते आणि औषधी गुणधर्म शरीराला लाभदायक ठरतात. 

त्यामुळे आता चहा कसा सोडू ही सबब देणे बंद करा आणि आलं लिंबाचा चहा सुरू करा! 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स