शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Health Tips: 'तिने केलं म्हणून मी केलं'... हे वागणं बरं नव्हं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 11:50 IST

आपल्यातला प्रत्येक जण एकमेवाद्वितीय (Unique) असतो. प्रत्येकाची शरीराची बांधणी, त्याची एकूण जडणघडण, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची कुवत वेगवेगळी असते.

- डॉ. नेहा पाटणकर

'अगं, माझ्या मैत्रिणीनं हा डाएट चार्ट फॉलो केला आणि १५ दिवसांत मस्तच रिझल्ट दिसला. हा चार्ट आता मीही ट्राय करणारेय.'

'ट्रेनमधली एक जण अमुक-अमुक गोळ्यांबद्दल सांगत होती, पाठदुखीवर एकदम रामबाण आहे म्हणे... तिच्याकडून घेतलंय नाव, आठवडाभर घेऊन बघू या काय होतंय.'

ही अशी वाक्यं आपण आजूबाजूला बऱ्याचदा ऐकतो. 'हिने सांगितलं' किंवा 'तिने केलं म्हणून मीही', ही वृत्ती आज पाहायला मिळते. पण, इतर अनेक ठिकाणी स्त्रियांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन दिसतो, त्या जसं प्रॅक्टिकली वागतात, तसा विचार औषध-गोळ्यांच्या बाबतीत - अर्थात सर्वात महत्त्वाच्या आरोग्याच्या बाबतीत का होत नाही?

आज-काल सेलिब्रेटी अमुकतमुक गोष्ट करतात किंवा वापरतात, अशा जाहिराती येतात. काही सेलिब्रिटी खरंच ते सगळं करतही असतील, पण हे सगळं तंतोतंत पाळण्यासाठी त्यांच्याबरोबर माणसांचा मोठा ताफा असतो, त्यांची टीम असते. या हिरो-हिरोइनना सगळं हातात मिळत असतं. कमनीय फिगर किंवा मुलायम त्वचा राखण्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपयेही मिळत असतात. त्याच्याकडे पाहून आपल्याला हेवा वाटतो. आपल्यालाही त्यांच्यासारखंच व्हायचं असतं. पण, घर, कुटुंब, मुलं, करिअर सांभाळून ते सगळं करताना आपली कशी तारेवरची कसरत होते आणि शेवटी काय होतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. 

या सगळ्यात एक मूलभूत विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तो म्हणजे, आपल्यातला प्रत्येक जण एकमेवाद्वितीय (Unique) असतो. प्रत्येकाची शरीराची बांधणी, त्याची एकूण जडणघडण, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची कुवत वेगवेगळी असते. उदाः विशिष्ट प्रदेशातील स्त्रियांचे खांदे आणि छाती जास्त रुंद असते. पोट आणि छाती या भागांवर फॅट जास्त जमा होतात. शाकाहारी खाणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रथिनं मिळवण्यासाठी वेगळ्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो. प्रत्येक शरीराची पचनशक्ती वेगळी असते आणि हेच अन्न अतिरिक्त झालं तर कुठे साठवायचं ते स्नायूंच्या मेटाबोलिझमवर अवलंबून असतं. 

अक्षय कुमार किंवा सलमान खान १२ अंडी खातो म्हणून अनेक तरुणही डोले-शोले मिळवण्यासाठी तसा प्रयोग करतात. पण, अभिनेत्यांचे personal trainers रात्री बारा वाजताही त्यांचा वर्कआऊट घेण्यासाठी तत्परतेने येतात. आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी कोणती जिम रात्री चालू असते, याचा विचार होत नाही. मग एवढे प्रोटिन्स पचले नाही म्हणून औषधांचा मारा नाही तर loose motions झाले म्हणून हॉस्पिटलच्या वारीशिवाय पर्याय उरत नाही.

मुलींचा वेगळाच खाक्या. फक्त फळांचा रस पिणे किंवा दिवसभर न जेवता बाहेर फक्त पिझ्झा किंवा बर्गर खाणे. त्यामुळे विटॅमिन्सची कमतरता झाली की चिडचिड, डोकेदुखी, पाळीचे त्रास, केस गळणे चालू होते.

सध्या सगळ्या डॉक्टरांची डोकेदुखी म्हणजे दर दोन तासांनी खाल्ल्यामुळे तक्रारी घेऊन आलेल्या स्त्रिया. दर दोन तासांनी खाल्लं पाहिजे गं, असा सल्ला ऐकून त्या हा उपक्रम सुरू करतात. पण एखाद्या दिवशी जरासा उशीर झाला की यांना अजिबात सहन होत नाही. अॅसिडीटी होते. मूड स्विंग होतात. इन्सुलीन हार्मोनचा तर चक्क बोजवारा उडतो. काहीही खाल्ल्यामुळे इन्सुलीनची लेव्हल वाढते. नंतर नंतर ही वाढलेली लेव्हल insulin resistance निर्माण करते, ज्यामुळे pcos होण्याची शक्यता वाढते किंवा अति इन्सुलीन पाझरल्याने स्वादुपिंडाची इन्सुलीन पाझरवण्याची क्षमताच कमी होते.म्हणजे लवकरच डायबेटीसला दिलेलं आमंत्रण.

याउलट यूकेमधे झालेलं संशोधन असं सांगतं की, लिव्हर( यकृत) आणि स्वादुपिंडाच्या आजूबाजूची फॅट कमी केली तर मधुमेहावर नक्कीच मात करता येते. पण हे कळणार कसं?

BCA नावाची चाचणी केली तर स्वतःच्या शरीराला नीट समजून त्याची आतली जडणघडण कळून येते.

BCA अर्थात Body Composition Analysis. यामध्ये फक्त वजनच नव्हे, तर स्नायूंचे वजन, हाडांचे वजन, शरीरातील फॅट्स आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे शरीरातील महत्त्वाच्या ऑर्गन्सभोवतालची, म्हणजे व्हिसेरल फॅट सुद्धा कळून येते. 

म्हणूनच कुठलीही आहारपद्धती स्वीकारण्याऐवजी, तिचा आपल्यावर नक्की चांगला उपयोग होईल ना, याचा सारासार विचार करूनच त्याचा अवलंब करावा. एखाद्यासाठी जे औषध असेल ते दुसऱ्यासाठी विषही ठरू शकतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला