शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रोज ३० मिनिटं सायकल चालवाल; तर  ५ मोठ्या आजारांपासून लांब राहाल; जाणून घ्या फायदे

By manali.bagul | Updated: January 5, 2021 16:16 IST

सायकलिंग एक असा व्यायाम आहे. जो रोज केल्यास तुम्हाला जीमला जाण्याची किंवा इतर  व्यायाम करण्याची गरज भासत नाही.

तुम्ही सगळ्यांनीच लहानपणी सायकल चालवली असेल. जेव्हा शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी तुम्ही सायकलचा वापर करत होतात तेव्हा खूप फीट असाल. सायकलिंग एक असा व्यायाम आहे. जो रोज केल्यास तुम्हाला जीमला जाण्याची किंवा इतर  व्यायाम करण्याची गरज भासत नाही. सध्याच्या स्थितीत कोरोना व्हायरसबरोबरच लोकांना वेगवेगळ्या संक्रमणांचा समना करावा लागत आहे. आजारांशी लढण्यासाठी फीट राहण्याची गरज सगळ्यांनाच असते. आज आम्ही तुम्हाला सायकलिंग करण्याचे फायदे सांगणार आहोत. 

पोटाची चरबी कमी होते

रोज ३० मिनिट सायकल चालवल्यानं पोटावरच जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते.  जीमला जाऊन तुम्ही अनेक तास घाम गाळत असता. त्यापेक्षा  अर्धा तास सायकल चालवल्यानं मेटाबॉलिक रेट म्हणजेच जेवण पचवण्याची  क्षमता वाढते. मासपेशी मजबूत होऊन बॉडी फॅट कमी होते. 

हार्ट अटॅकचा धोका कमी होतो

सायकल  चालवण्यामुळे मासपेशी मजबूत होतात. श्वासांसंबंधी आजार उद्भवत नाहीत. स्टॅमिना वाढतो. रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. त्यामुळे रक्तप्रवाह चांगला राहतो.  तसंच हृदयाच्या आजारांचा सामना करावा लागत नाही.

फिजीकल रिलेशन अधिक चांगले होईल

सायकलिंग केल्याने बॉडीचे सर्वच मसल्स हेल्दी आणि मजबूत होतात. ज्याने तुमची सेक्सश्युअल पॉवर वाढते. कॉरनेल युनिव्हर्सिटीतील एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज काही वेळ सायकल चालवणारे पुरूष किंवा महिला त्यांच्याच वयाच्या दुस-या लोकांपेक्षा सेक्स लाईफचा अधिक आनंद घेऊ शकतात.

कॅलरीज कमी होतील

ज्या लोकांना समोसे, कचोरी, कोल्ड्रींक किंवा दुसरे हाय कॅलरी स्नॅक्स खाणे पसंत आहे. पण हे जास्त खाल्ल्याने मिळालेली एक्स्ट्रा कॅलरी घटवणे त्यांच्यासाठी कठिण आहे. अशात सायकलिंग करून तुम्ही तुमच्यात वाढलेली एक्स्ट्रा कॅलरी कमी करू शकता.

बर्ड फ्लू मध्ये हजारो पक्ष्यांना का ठार मारलं जातं? जाणून घ्या यामागचं कारण

ब्रेन पॉवर वाढेल

सायकल चालवणा-यांची ब्रेन पॉवर सायकल न चालवणा-यांच्या तुलनेत १५ टक्के जास्त असते. अमेरिकेच्या इलिनॉय युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरने अभ्यासातून निष्कर्ष काढला की, सायकल चालवल्याने तुमचं हृदय मजबूत राहतं. शिवाय यामुळे तुमच्या शरिरात ब्रेन सेल्सही वाढतात.

 अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

त्वचा, शरीरयष्टी चांगली राहिल

जिमसाठी जास्त वेळ देऊ शकत नसाल तर काही तास सायकाल चालवल्याने ब्लड सेल्स आणि स्किनमध्ये ऑक्सीजनचा पुरेसा प्रवाह होत असल्याने त्वचा जास्त चांगली आणि चमकदार दिसते. म्हणजे तुमच्या वयाच्या लोकांपेक्षा तुम्ही जास्त तरुण दिसाल. असे अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील अनेक दिवसांच्या रिसर्चमधून समोर आले आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स