आंबा खाल्याने वजन, रक्तातील साखर वाढते? जाणून घ्या नेमकं खरं काय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:32 PM2024-04-24T16:32:14+5:302024-04-24T16:41:49+5:30

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. दरम्यान या सीझनमध्ये आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.

health tips mango increase weight and blood suger level or not know about benifits of eating mango  | आंबा खाल्याने वजन, रक्तातील साखर वाढते? जाणून घ्या नेमकं खरं काय

आंबा खाल्याने वजन, रक्तातील साखर वाढते? जाणून घ्या नेमकं खरं काय

Health Tips :  सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. दरम्यान या सीझनमध्ये आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मॅंगो लव्हर्स या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. 

फळांचा राजा म्हणजे आंब्याला म्हटलं जातं. आंबा हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पण आंबा खाल्याने वजन तसंच ब्लड प्रेशर वाढतं असा अनेकांचा समज आहे. आपण या निमित्ताने खरं काय ते जाणून घेणार आहोत. 

ब्लड शुगर कंट्रोल- 

चवीला गोड असणाऱ्या आंब्याचं अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते त्यामुळे आंबा खाणं टाळावं असं काही जणांचं मत आहे.न्यूट्रीएंट्स जर्नलने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, आंब्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 

या स्टडीमध्ये जास्त वजन असणाऱ्या माणसांना १२ आठवडे आंब्याचं सेवन करायला सांगितलं. अभ्यासात त्यांच्या  शरीरातील शुगर लेवल कमी झाल्याचं निष्पन्न झालं. या निष्कर्षावरून ब्लड शुगर असणाऱ्या व्यक्ती आपल्या बॅलेन्स डाएटमध्ये आंब्याचा समावेश करु शकतात.  

वजन वाढण्याचं नो टेन्शन- 

या फळामध्ये  फायबर,व्हिटॅमीन सी आणि अँटी ऑक्सीडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्यामध्ये व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन इ आढळते. ज्यामुळे आंब्याच्या सेवनाने वारंवार भूक लागत नाही, आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

Web Title: health tips mango increase weight and blood suger level or not know about benifits of eating mango 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.