शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Health Tips : इम्यूनिटी वाढवण्याच्या नादात करू नका ही चूक, होऊ शकतो लिव्हर फेलचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 13:28 IST

Immunity booster giloy side effect : काही लोक आयुर्वेदिक उपाय करूनही इम्यूनिटी वाढवत आहेत. पण कुणाच्याही सल्ल्याशिवाय, विचार किंवा योग्य माहिती न घेता इम्यूनिटी वाढवण्याचा प्रयत्न करणंही अडचणीत पाडू शकतं.

 Immunity booster giloy side effect : वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचं व्हेरिएंट ओमायक्रॉनने लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी लोकांचा भर इम्यूनिटी वाढवण्यावर आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने उपाय करत आहेत. काही लोक आयुर्वेदिक उपाय करूनही इम्यूनिटी वाढवत आहेत. पण कुणाच्याही सल्ल्याशिवाय, विचार किंवा योग्य माहिती न घेता इम्यूनिटी वाढवण्याचा प्रयत्न करणंही अडचणीत पाडू शकतं.

इम्यूनिटी बूस्टर आहे गुळवेल

गुळवेलाला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. इम्यूनिटी वाढवण्यासाठी लोक याचं सेवन करत आहेत. गुळवेल एकप्रकारची जडीबुटी आहे. कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी याचा मोठा वापर झाला आणि मोठ्या प्रमाणात लोक याचं सेवन करू लागले. पण याचं जास्त सेवन केल्याने आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकतं.

लिव्हरवर वाईट प्रभाव

गुळवेल आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे आणि याच्या पानांचा व मुळांचा वापर केला जातो. लोक याच्या मूळांचा आणि पानांचा रस काढून पितात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटीसहीत १३ मेडिकल सेंटर्सच्या रिसर्चमधून चिंताजनक माहिती समोर आली आहे. यात लिव्हर रिसर्च क्लब ऑफ इंडियाला आढळलं की, गुळवेलचा जास्त काळ सेवन करत असलेल्या लोकांमध्ये क्रॉनिक लिव्हर डिजीज किंवा लिव्हर फेलिअरची समस्या होती.

मीडिया रिपोर्टनुसार, केजीएमयूमध्देय गॅस्ट्रोएंटरोलॉजीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. अजय कुमार पटवा म्हणाले की, '६७.४ टक्के रूग्णांमध्ये लिव्हरच्या समस्येचं मुख्य कारण गुळवेल होतं. तर या लोकांमध्ये डायबिटीज, थायरॉइड, हाय ब्लड प्रेशरसारख्या कोणत्याही समस्या नव्हत्या. ते दारूचं सेवनही करत नव्हते'.

अशा बरं होईल की, गुळवेलाचं सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासोबतच इम्यूनिटी वाढवणाऱ्या इतर गोष्टींचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. योग्य प्रमाणात करा. नाही तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या