शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! उभे राहून पाणी पिताय? होतील हे दुष्परिणाम; वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 15:37 IST

दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या सवयीही आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात.

Health Tips : दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या सवयीही आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आरोग्य नीट राखायचे असेल तर काही पथ्ये पाळावीच लागतात.

आजकाल लोक बाटलीतील पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच ते उभे असताना पाणी पितात. असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. बऱ्याचदा आपण पाहिले असेल काही जण नेहमीच पाणी पिताना बसून पाणी पितात. तर काहींना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. पण या सवयीमुळे आपलेच नुकसान होते.  आयुर्वेदात असे म्हटले आहे की, उभे राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये, त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे पोटाच्या समस्याही वाढू शकतात. 

जर तुम्ही चालताना उभे राहून पाणी पीत असाल तर काळजी घ्या, कारण या स्थितीत पाणी पिल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. उभे राहून किंवा झोपून पाणी पिणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. बसून  आरामात पिणे पाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पाणी पोहोचते आणि आपले काम योग्य प्रकारे करू शकते. 

उभे राहून पाणी पिण्याचे तोटे पुढीलप्रमाणे:  

मूत्रपिंडांवर होतो परिणाम-

मूत्रपिंडाच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये. हे देखील उभे राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम आहेत. उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यांचा त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पाणी शरीराच्या खालच्या भागात लवकर पोहोचते आणि पचनक्रिया बिघडू लागते म्हणून उभे राहून कधीही पाणी पिऊ नये आणि बसून पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

तज्ज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना किडणीच्या संबंधित काही असेल त्यांनी उभे राहून पाणी पिणे टाळावे. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने मुत्रपिंडाला हानी पोहचू शकते. त्यामुळे आरामात एका जागेवर बसून पाणी प्यावे.

पचनसंस्थेवर होतो परिणाम -

उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते. त्यामुळे बसून हळू हळू पाणी प्यावे. पण जर आपण उभं राहून पाणी पीत असाल तर, पाणी पोटाच्या खालच्या भागात पोहोचते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWaterपाणीHealthआरोग्य