शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एक्सरसाइज करताना म्युझिक का ऐकतात लोक? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 16:53 IST

Health Tips : म्युझिकने आयुष्यातील वेगवेगळ्या प्रकारचे ताण-तणाव, चिंता, काळजी दूर करण्यास मदत मिळते

Health Tips :  वर्कआउट किंवा एक्सरसाइज करताना म्युझिक ऐकणं काही नवीन बाब नाहीये. पण गरजेचं हे आहे की, तुम्ही तुम्हाला कसं म्युझिक आवडतं हे समजून घ्या आणि त्या म्युझिकचा आपल्या वर्कआउट रुटीनमध्ये समावेश करा. असं केल्याने एक्सरसाइज करताना तुमचं मन लागेल आणि अधिक एनर्जीने तुम्ही एक्सरसाइज करू शकाल.

वर्कआउटसाठी फायदेशीर म्युझिक 

म्युझिकने आयुष्यातील वेगवेगळ्या प्रकारचे ताण-तणाव, चिंता, काळजी दूर करण्यास मदत मिळते. तेच म्युझिक ऐकत वर्कआउट केल्याने लक्ष केंद्रीत होतं आणि वर्कआउटचा दबावाची जाणीव कमी होते. अशाने १५ मिनिटे एक्सरसाइज अधिक केली जाते. थिरकायला लावणारे बीट म्युझिक असेल तर याने मेंदू अधिक वेगाने काम करतो आणि तुम्हीही त्यामुळे वेगाने एक्सरसाइज करू शकता.

जास्त मेहनतीसाठी मिळते मदत

२०१० मधील एका रिसर्चनुसार, मेलोडिअस म्युझिकच्या तुलनेत फास्ट बीट असलेलं म्युझिक ऐकलं तर भरपूर मेहनतीने एक्सरसाइज करण्यास मदत मिळते. जर तुम्ही १२० ते  १४० बीट्स प्रति मिनिट असलेलं म्युझिक ऐकाल तर याचा तुम्हाला एक्सरसाइज करताना चांगला परिणाम बघायला मिळेल. प्रत्येकांची म्युझिकची एक आपली आवड असते, ज्याने त्यांचा मूड चांगला होतो. काही गाण्यांसोबत आपल्या आठवणी जुळलेल्या असतात, ही गाणी आपल्याला आठवणींच्या जगात घेऊन जातात. 

एकाच वेगाने काम करण्यास मदत 

तुमच्या वर्कआउट म्युझिकची लय मेंदूची मोटार उत्तेजित करते. याने कधी एक्सरसाइज करताना मेंदूला वेगवेगळे संकेत मिळतात आणि एक्सरसाइज अधिक चांगली करू शकता. म्युझिकमधून तुम्हाला ऊर्जा मिळते. एका गति कायम ठेवण्यास शरीराल मदत मिळते आणि शरीर योग्यप्रकारे काम करतं.

मूड चांगला ठेवणे

एका रिसर्चनुसार, म्युझिक तुमचा मूड बदलण्यास मदत करतं आणि स्वत:ला ओळखण्यासही मदत करतं. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना म्युझिक ऐकण्यास सांगून त्यांना विचारात गुंतण्याची संधी देण्यात आली की, ते काय आहेत? आणि त्यांना काय व्हायचं आहे? म्युझिक ऐकून लोकांना नकारात्मक विचारांमधून सुटका मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स