HEALTH : 'या' १० वस्तूंच्या वापराने चष्मा होईल बाद !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 15:39 IST2017-04-27T10:09:50+5:302017-04-27T15:39:50+5:30
सतत बराच वेळ काम करणे, अपूर्ण झोप किंवा मोबाइल-संगणकावर कायम नजर टिकवून ठेवणे या कारणांनी सध्या लहान वयातच चष्मा लागतो. मात्र आयुर्वेदात असे काही उपाय आहेत, जे डोळ्यांचे आरोग्य सुदृढ ठेऊन चष्मा घालवायला मदत करतात.
.jpg)
HEALTH : 'या' १० वस्तूंच्या वापराने चष्मा होईल बाद !
सतत बराच वेळ काम करणे, अपूर्ण झोप किंवा मोबाइल-संगणकावर कायम नजर टिकवून ठेवणे या कारणांनी सध्या लहान वयातच चष्मा लागतो. मात्र आयुर्वेदात असे काही उपाय आहेत, जे डोळ्यांचे आरोग्य सुदृढ ठेऊन चष्मा घालवायला मदत करतात.
१) आवळा
कोरड्या आवळ्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या पाण्याला गाळणीने गाळून त्याने डोळे धुवा.
२) त्रिफळा
रात्री त्रिफळा पाण्यात पाण्यात भिजून ठेवा. सकाळी या पाण्याने डोळे धुवा.
३) जिरे
जिरे आणि मिश्रीला एक समान घेऊन बारीक करा. या मिश्रणाचे नियमित एक चमच तुपासोबत सेवन करावे.
४) इलायची
तीन ते चार हिरव्या इलायच्या आणि एक चमच बडीशोफ एकत्र करुन बारीक कुट तयार करा. या मिश्रणाला रोज एक ग्लास दुधासोबत सेवन करा.
५) बडीशोफ
एक चमच बडीशोफ, दोन बदाम आणि आणि अर्धा चमच मिश्री एकत्र करु न बारीक करा. या मिश्रणाला रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधासोबत घ्या.
६) बदाम
रोज रात्री ६ ते ७ बदाम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठून बदामांची साल काढून सेवन करा.
७) गावरानी तूप
कान आणि डोळ्यादरम्यान रोज ५ ते १० मिनिट गावरानी तूपाने मसाज केल्यास डोळ्याचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.
८) गाजर
गाजरमध्ये विटॅमिन ‘सी’ असते. याच्या नियमित सेवनाने किंवा ज्यूस पिल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
९) मोहरीचे तेल
रोज रात्री झोपण्याअगोदर तळव्यांची मोहरीच्या तेलाने मालिश करा.
१०) ग्रीन टी
दिवसातून नियमित २ ते ३ कप ग्रीन टी प्या. यातील अॅन्टिआॅक्सिडेंट्समुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.
Also Read : दृष्टी कमजोर आहे का?