HEALTH : हे आहेत मेथी खाण्याचे 10 मोठे फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 12:08 IST2017-04-25T06:38:11+5:302017-04-25T12:08:11+5:30
बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे आपणास माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!
.jpg)
HEALTH : हे आहेत मेथी खाण्याचे 10 मोठे फायदे !
मेथीच नव्हे तर मेथीचे बीसुद्धा खूप गुणकारी असल्याने संपूर्ण भारतात मोठ्या आवडीने मेथीचे सेवन केले जाते. मेथीमध्ये विशिष्ट गुणधर्म असून अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्याना मेथी दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.
मेथी खाण्याचे काय आहेत फायदे
* मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो. तसेच एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाचीही समस्या दूर होते.
* मेथी केसांसाठीही उपयुक्त आहे. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा.
* केस गळती थांबविण्यासाठी मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा.
* मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.
* मेथीदाण्याची पावडरची पेस्ट तयार करून त्वचेवर लावल्यास जळाल्याचे व्रण दूर होण्यास मदत होईल.
* पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.
* मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.
* अपचन किंवा बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घ्यावेत. थोडेसे मेथीदाणे सकाळ-संध्याकाळ पाण्यातून घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होऊ शकते.
* उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात. अर्धा चमचा मेथीचा दाणा घ्या. त्या रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चाऊन खाऊन टाका. याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल.
* मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. दररोज तीन ग्रॅम मेथीदाण्याचे सेवन महिलांसाठी लाभदायक ठरते.