HEALTH : दुसऱ्या बाळाच्या तयारीआधी ‘या’ ६ गोष्टी महत्त्वाच्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 15:01 IST2017-04-18T09:31:48+5:302017-04-18T15:01:48+5:30
तुम्ही दुसऱ्या बाळासाठीही रोमॅन्टीक हनिमुन प्लॅन करु शकता. कारण अशा गोष्टींसाठी पुरेसा एकांत गरजेचा असतो.
.jpg)
HEALTH : दुसऱ्या बाळाच्या तयारीआधी ‘या’ ६ गोष्टी महत्त्वाच्या !
पहिलं बाळ एकाकी पडू नये म्हणून बहुतेक कपल्स दुसऱ्या बाळाचे प्लॅनिंग करतात. शिवाय दोन मुलांचा साभाळ करणे ही देखील तारेवरची कसरतच असते. कारण पूर्ण वेळ बाळांना सांभाळण्यातच जातो. कधीकधी सतत मुलांचे डायपर बदलत राहिल्याने तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यास वेळ कमी मिळू शकतो. पण आपण जर काही गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केले तर हा तुमच्या आयुष्यातला सुखद असा काळ ठरु शकतो.
१. पहिल्या बाळाला स्वावलंबी बनवा
दुसऱ्या बाळाचा विचार करण्याआधी पहिले बाळ तुमच्यावर अवलंबून राहणार नाही याची काळजी घ्या. यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या अपत्यामध्ये कमीतकमी तीन ते चार वर्षाचे अंतर ठेवा. शिवाय त्याला स्वावलंबी होण्यासाठी स्वत:च्या हाताने जेवणे, टॉयलेटला जाणे, स्वत:चा ड्रेस घालणे, खेळणी जागेवर ठेवणे या सवयी त्याच्या वयाच्या दुसऱ्या वषार्पासूनच लावा. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्यादा आई व्हाल तेव्हा तुम्हाला नवीन बाळाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल.
२. रोमॅन्टीक हनीमुन प्लॅन करा
तुम्ही दुसऱ्या बाळासाठीही रोमॅन्टीक हनिमुन प्लॅन करु शकता. कारण अशा गोष्टींसाठी पुरेसा एकांत गरजेचा असतो. हनीमुनला जाताना तुमच्या पहिल्या बाळाला आई, बहीण अथवा सासरच्या मंडळींकडे ठेवा. असे करताना अपराधी वाटून घेऊ नका कारण तुम्ही तुमच्या बाळाला भावंडं मिळावं यासाठीच हे प्रयत्न करत आहात.
३. बचत करणे सुरु करा
दोन मुलांच्या संगोपनासाठी आपणाजवळ पुरेसा पैसा असणे गरजेचे आहे. यासाठी आपणास अधिक बचत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. विशेष म्हणजे हे पहिल्या बाळाच्या जन्मानंतरच करायला हवे होते. पण काही हरकत नाही आता जर तुम्ही दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही हे आवर्जुन करणे गरजेचे आहे.
४. काही वेळ एकांतात घालवा
दुसऱ्या प्रेगन्सीनंतर तुम्हाला स्वत:साठी वेळ देणे अजिबात शक्य होणार नाही.यासाठी आता एक दिवस फक्त स्वत:साठी घालवा.कोणालाही बरोबर न घेता तुमच्या आवडत्या ठिकाणी जा व फक्त तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा.
५. गृह सजावट करा
तुमचे दुसरे बाळ येण्यापुर्वी तुमचे घर छान सजवा.तुमच्या दोन्ही मुलासांठी नवीन बेड व वॉर्डरोब खरेदी करा. कारण एकदा तुमची दुसरी डिलिव्हरी झाली की तुम्हाला दोन मुले सांभाळताना या गोष्टी करण्यासाठी वेळच मिळणार नाही.
६. आरोग्य सुदृढ ठेवा
तुम्ही दुसऱ्यादा प्रेगन्ट असाल तर आता तुम्हाला स्वत:च्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी संतुलीत व पौष्टिक आहार, चालणे, धावणे व योगासने या गोष्टी तुम्ही नक्कीच करु शकता.
Also Read : HEALTH : ‘मिसकॅरेज’ टाळण्यासाठी हे आहेत प्रभावी उपाय !