HEALTH : उन्हाळ्यात मुलांसाठी खास आईस कॅन्डी रेसिपी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 18:20 IST2017-03-17T12:50:51+5:302017-03-17T18:20:51+5:30
उन्हाळ्यात लहान मुलांचा थंडपेय किंवा बर्फाचे पदार्थ खाण्यापिण्याकडे जास्त कल असतो. यासाठी काही सोप्या आणि खास आईस कॅन्डी रेसिपी बनवून मुलांना दिल्यास मुले नक्कीच खूश होतील.
.jpg)
HEALTH : उन्हाळ्यात मुलांसाठी खास आईस कॅन्डी रेसिपी !
उन्हाचा पारा चढला की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण शरीराला गारवा मिळण्यासाठी धावपळ करतात. विशेष म्हणजे लहान मुलांचा थंडपेय किंवा बर्फाचे पदार्थ खाण्यापिण्याकडे जास्त कल असतो. यासाठी काही सोप्या आणि खास आईस कॅन्डी रेसिपी बनवून मुलांना दिल्यास मुले नक्कीच खूश होतील.
* बेरी पॉप्स
ही रेसिपी तयार करण्यासाठी चिरलेली स्ट्रॉबेरी घेऊन त्या रेड करंट, ब्लूबेरी व ब्लॅकबेरी या फ्रोझन बेरी मिसळून वरून लिंबाचा रस आणि मध मिसळा. पॉप्सीकल मोल्डमध्ये हे मिश्रण ओतून फ्रीझरमध्ये थंड करा.
* अॅव्होकॅडो कोकोआ पॉप्स
हाय फॅट असलेले क्रीम वगळून क्रीमचे गुण असलेले अॅव्होकॅडो वापरा. अॅव्होकॅडो, नारळाचे दूध व कोको पावडर आणि काही चमचे कन्डेन्स्ड मिल्क घ्या. हे मिश्रण एकत्र करून पॉप्सिकल मोल्डमध्ये ओतून फ्रीझमध्ये सेट करायला ठेवा. सेट झाल्यावर एकेक पॉप्स वितळलेल्या चॉकलेटच्या भांड्यात बुडवून पटापट खा.
* टॅमॅरिंड टीज
यासाठी थोडीशी साखर घालून डझनभर चिंचा पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर चिंच वाटून घेऊन गाळून घ्या. अशाप्रकारे हवा तेवढा चिंचेचा गर घेऊन टॅमॅरिंड टीज बनवू शकता.
* मँगो आल्मंड पॉप्सी
आंब्याचा गर, बदाम दूध व मध या तीन गोष्टी वापरून तुम्ही चविष्ट कुल्फी बनवू शकता. तीन्ही गोष्टी एकत्र मिसळून एकजीव करा. हे मिश्रण साच्यात भरून फ्रीझमध्ये ठेवले की कुल्फी तयार.
* फ्रेश फ्रुट फ्रेंझी
ही रेसिपी तयार करण्यासाठी तुमची आवडती फळे व ज्यूस या गोष्टी आवश्यक आहेत. फ्रेश किवी, टरबूज, स्ट्रॉबेरी यांचे बारीक काप घेऊन पॉप्याकस मोल्डमध्ये टाकू न उरलेली जागा फ्रेश ज्यूसने भरून घ्या. फ्रीझरमध्ये ठेवून थंड करा.