शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Health: आला पावसाळा, पोट सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 12:30 IST

Health Tips For Rainy Season: पावसाळा हा कितीही आल्हादायक वाटत असला तरी याच  काळात नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असते. पावसाळी आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू  यांचा समावेश असला तरी विशेष करून पावसाळ्यात पोटविकाराचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

- डॉ. अमित मायदेव(पोटविकार तज्ज्ञ, संचालक, बलदोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई)पावसाळा हा कितीही आल्हादायक वाटत असला तरी याच  काळात नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असते. पावसाळी आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू  यांचा समावेश असला तरी विशेष करून पावसाळ्यात पोटविकाराचे रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पोटविकारात प्रामुख्याने मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, आतड्याला सूज येणे, अपचन, वाढते पित्त या आजारांचा सामना रुग्णांना करावा लागतो. हा आजार होण्याचे कारण म्हणजे खाद्य पदार्थ आणि पाण्यातून झालेला संसर्ग. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

रस्त्यांवर मिळणारे चाट आणि ज्यूस यामध्ये ज्या पाण्याचा वापर होतो, त्यात सूक्ष्म जंतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून मोठ्या प्रमाणात पोटाचे विकार निर्माण होतात. त्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे या काळात टाळावे. या दमट वातावरणात शरीरातील पचनसंस्थेची कार्यक्षमता मंदावते. यामुळे गॅस्ट्रोइंट्रायटिस होण्याची शक्यता असून पोटात सतत जळजळ होते. कारण यामध्ये पचन संस्थेवर जीवाणूंचा विपरीत परिणाम होतो. पावसाळ्यात गॅस्ट्रोच्या साथीचे प्रमाण अधिक असते. 

- पाणी उकळून व गाळून प्यावे. पुरेसे पाणी प्यावे. -जेवण योग्य पद्धतीने शिजवून आणि चांगल्या पद्धतीने साठवून ठेवावे. - दररोज संतुलित आहार  घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायाम, कसरती, योग  केला पाहिजे, त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. -कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. कारण तणावाचा थेट परिणाम शरीरातील पचनसंस्थेवर होत असतो.- वॉशरूममधून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. रस्त्यावरील कापलेली फळे खाणे शक्यतो टाळा. घरामध्ये जेवढी स्वच्छता राखता होईल, तितकी राखण्याचा प्रयत्न करा. - घरात हवा खेळती ठेवून कोंदट वातावरणात अधिक काळ राहू नका.- पोटविकाराची कोणतीही समस्या असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.-  स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका. 

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सRainपाऊस