HEALTH : शरीरातील नस अचानक चढल्यावर करा घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 11:51 IST2017-04-20T06:21:19+5:302017-04-20T11:51:19+5:30
प्रत्येकाला हा त्रास कधीना कधी होतोच, यासाठी हि माहिती आपणास नक्की कामात येऊ शकते...
.jpg)
HEALTH : शरीरातील नस अचानक चढल्यावर करा घरगुती उपाय !
जेव्हा शरीराच्या एखाद्या अवयवाची नस चढते तेव्हा खूप त्रास होतो. बऱ्याचदा हा त्रास एवढा वाढतो की, याला ठिक व्हायला खूप वेळ लागतो. अशावेळी आपण काही घरगुती उपायांद्वारे या त्रासापासून सुटका मिळवू शकता.

* नस चढलेल्या ठिकाणी बर्फाने शेकावे. यामुळे आपणास आराम मिळू शकतो.

* अशक्तपणामुळे ही समस्या निर्माण होते. यासाठी मोसंबी, डाळिंब, सफरचंद, पपई, केळी आदी फळांचे सेवन करावे. शिवाय पालक, टमाटर, कोशिंबर, बटाटे, गाजर आदी भाजीपाल्यांचेही सेवन केल्याने आराम मिळेल. सोबतच ड्राय-फ्रूट्सदेखील या त्रासात फायदेशीर ठरतात.

* बऱ्याचदा नस चढल्यानंतर त्याठिकाणी दुखण्याचा त्रास बराच वेळ राहतो. त्यासाठी कच्चे मीठ चाटावे. याने नक्की आराम मिळतो.

* कित्येक लोकांना झोपताना नस चढते, ज्यामुळे खूपच त्रास होतो. जर आपणासदेखील हा त्रास असेल तर पायांच्या खाली उशी ठेवून झोपण्याची सवय लावा.

* जर उजव्या पायाची नस चढली असेल तर डाव्या हाताच्या साह्याने आपल्या कानाच्या खालील भागाला दाबावे. याने आराम मिळेल.