Health : हॅँगओवर झालाय? वापरा ‘हे’ आरोग्यदायी घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 13:33 IST2017-04-06T07:54:33+5:302017-04-06T13:33:41+5:30
बऱ्याचदा हॅँगओवरने डोक दुखत, चक्कर येतात, यामुळे पूर्ण दिवस खराब होतो, असे होऊ नये म्हणून या घरगुती उपायांचा अवलंब करा...
.jpg)
Health : हॅँगओवर झालाय? वापरा ‘हे’ आरोग्यदायी घरगुती उपाय !
मद्यपान केल्याने हॅँगओव्हर होणे स्वाभाविक आहे. बरेच लोक हॅँगओव्हर उतरविण्यासाठी लिंबू पाणी पितात आणि काही लोक तर पेनकिलर घेतात. पेनकिलर घेतल्याने जरी आपणास त्वरित आराम मिळत असेल मात्र यामुळे आपल्या यकृतावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. आज आम्ही आपणास हॅँगओवर उतरविण्यासाठी आरोग्यदायी उपाय सांगत आहोत.
* लिंबू पाणी
लिंबू पाणी हॅँगओवर उतरविण्यासाठी सर्वात चांगला आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी झोपण्याअगोदर पाण्यात लिंबू, मीठ आणि साखर मिक्स करु न प्यावे. जर रात्री पिणे शक्य नसेल तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर हे लिंबू पाणी प्या.
* संत्री
हँगओवरमध्ये संत्रीच्या रसाचे सेवन करणे एक सोपा घरगुती उपाय आहे. संत्रीचा रस रिहायड्रेशनमध्ये मदत करतो आणि यातील विटॅमिन सी मळमळ होण्यापासून बचाव करते. आपण यासोबत अंड्याचेही सेवन करु शकता.
* नारळ पाणी
नारळ पाण्यात साखर आणि कार्बोहायड्रेट खूपच कमी असते, सोबतच हे ९९ टक्के फॅट फ्री आहे. यात मिनरल आणि इलेक्ट्रोलेट्स हे तत्त्व असतात, जे शरीराला रिहायड्रेट करतात. विशेष म्हणजे अल्कोहोल घेतल्याने शरीरात ड्रायनेस निर्माण होतो, म्हणून अशावेळी नारळ पाणी अधिक फायदेशीर ठरते. हे नारळ पाणी शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते शिवाय मेंदूलाही एनर्जेटिक बनवून ठेवते.
* अद्रक
आपणास हॅँगओवर उतरावयाचा असेल तर अद्रकचा एक लहान तुकडा खा. याशिवाय आपण लसुनचाही आहारात समावेश करू शकता. यामुळे हॅँगओवर उतरण्यास मदत होईल.
* सूप
गरमागरम सूप पिल्यानेही आपण हॅँगओवर पासून मुक्त होऊ शकता.
* मिल्कशेक
झोपण्याअगोदर किंवा सकाळी उठल्यानंतर एक ग्लास दूधात केळ आणि मध मिक्स करु न मिल्कशेक बनवून प्यावे. हा मिल्कशेक आपल्याला हॅँगओवर कमी करण्यास मदत करेल आणि शरीराला पोषणही देईल.
* ब्लॅक कॉफी
सकाळी उठून एक कप ब्लॅक कॉफी पिणेदेखील हॅँगओवर उतरू शकतो. यामुळे हँगओवर तर उतरेलच शिवाय आपला मेंदू सक्रिय होऊन आपण रिफे्रश व्हाल.