HEALTH : ​सकाळी लिंबू पाणी पिणे हानिकारक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 17:31 IST2017-02-04T11:52:31+5:302017-02-04T17:31:14+5:30

लठ्ठ माणसांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

HEALTH: Drinking lemon water in the morning is harmful! | HEALTH : ​सकाळी लिंबू पाणी पिणे हानिकारक !

HEALTH : ​सकाळी लिंबू पाणी पिणे हानिकारक !

्ठ माणसांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. 
अनाशापोटी निंबू पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम होतात हे आज जाणून घेऊया.

* जर आपणास गॅस किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर आपण रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेणे टाळाच. कारण लिंबूमध्ये अ‍ॅसिडिक तत्त्व असतात, ज्यामुळे ही समस्या अजूनच वाढते. 

* लिंबू मध्ये आॅक्सलेट अ‍ॅसिड असते जे शरीरात क्रिस्टल स्वरुपात जमा होते. यामुळे किडनी आणि पित्ताच्या पिशवीत स्टोनची समस्या निर्माण होते. 

* लिंबू  पाणी पिल्याने लगेचच ब्रश करु नये कारण लिंबूतील अ‍ॅसिडमुळे दात कमकुवत होतात. त्यामुळे ब्रश करताना दात तुटण्याची शक्यता असते. 

* दिवसभरात फक्त एक किंवा दोन ग्लास लिंबू पाणी प्या. जास्त लिंबू पाणी पिल्याने लघवी जास्त होते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. 

* बहुतांश लोक केलेले जेवण पचविण्यासाठी लिंबू पाणी पितात. मात्र हे नुकसानकारकही ठरु शकते. पोटात अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंस्था बिघडू शकते. 

* जर आपले दात सेंसिटिव असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. किंवा लिंबू पाण्याचा दातांशी संपर्क  येऊ नये म्हणून स्ट्रॉने प्यावे.  

Also Read : लिंबूू खा, वजन घटवा !
                              

Web Title: HEALTH: Drinking lemon water in the morning is harmful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.