HEALTH : ढेकर आल्यास पोट भरले असे समजू नका, हे आहे खरे कारण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 15:09 IST2017-04-21T09:38:18+5:302017-04-21T15:09:58+5:30
जेवण झाल्यांनतर बहुतेकजणांना ढेकर येतात. जेवण पोटभरुन झाले म्हणून ढेकर येतात असा बऱ्याचजणांचा समज आहे, मात्र नेहमी ढेकर येण्यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे.
.jpg)
HEALTH : ढेकर आल्यास पोट भरले असे समजू नका, हे आहे खरे कारण !
जेवण झाल्यांनतर बहुतेकजणांना ढेकर येतात. जेवण पोटभरुन झाले म्हणून ढेकर येतात असा बऱ्याचजणांचा समज आहे, मात्र नेहमी ढेकर येण्यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे.
* ढेकर कसे येतात?
ज्याप्रमाणे कुकरमधील अन्न शिजून जास्त वेळ झाला की वॉल्व्ह आपोआप वर होऊन शिटी वाजते त्याप्रमाणे पोटात जमा झालेला गॅस आवाजासह तोंड व गळ्याद्वारे बाहेर निघतो. यालाच ढेकर येणे म्हणतात. जेवण केल्यानंतर पोटात गॅस तयार होतो. अन्ननलिका व पोटाच्या मध्ये डायफ्रॅम असतो. अन्न पोटात गेल्यावर हे आपोआप बंद होते. यामुळे पोटात गॅस जमा होतो. लेमन सोडा किंवा कोल्डड्रिंक पिल्यास पोटात गॅस तयार होतो. यामुळे शरीराची कंट्रोल रूम असलेला मेंदू गॅस बाहेर काढण्याची आज्ञा देतो. यानंतर काही स्नायू कडक होतात ज्यामुळे डायफ्रॅम उघडते. उघडलेल्या डायफ्रॅममधून गॅस गळा व तोंडाद्वारे बाहेर निघतो. हा गॅस म्हणजे पोट भरल्याची खूण नाही.
ढेकर आल्यावर आवाज का येतो?
जेव्हा जमा झालेला गॅस अन्ननलिकेत भरतो तेव्हा काही कंपने तयार होतात, यामुळे गॅस बाहेर निघताना आवाज येतो.
ढेकर न येणे
जर पोटात गॅस तयार होऊनही ढेकर येत नसेल तर गॅस बाहेर निघण्यासाठी आदेश देण्यास मेंदू उशीर करतोय असे समजावे. यामुळे आपल्याला मळमळ व्हायला लागते.
ढेकर न आल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होते, भूक मंदावते शिवाय पचनक्रियादेखील मंदावते.