HEALTH : मोड आलेले कडधान्य खाताय? सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 18:03 IST2017-03-22T12:33:41+5:302017-03-22T18:03:41+5:30
मोड आलेले कडधान्य जितके आरोग्यदायी आहेत तितकेच ते आरोग्यासाठी घातक आहे. ओलावा व दमटपणामुळे साल्मोनेला, लिस्टेरिया आदी किटाणू अंकुरित कडधान्यात आपले घर बनवतात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

HEALTH : मोड आलेले कडधान्य खाताय? सावधान !
बहुतांश लोक आरोग्य सुदृृढ राहावे म्हणून रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य वापरतात. यातून आपणास विटॅमिन ‘ई’ भरपूर प्रमाणात मिळते. मात्र हे मोड आलेले कडधान्य जितके आरोग्यदायी आहेत तितकेच ते आरोग्यासाठी घातक असल्याचे एका संशोधनातून जाहीर करण्यात आले आहे. अॅकॅडमी आॅफ न्यूट्रीशन अॅन्ड डायटेटिक्सच्या एका संशोधनानुसार कच्चे अंकुरित कडधान्य तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम निर्माण करणारे ठरू शकते. ओलावा व दमटपणामुळे साल्मोनेला, लिस्टेरिया आदी किटाणू अंकुरित कडधान्यात आपले घर बनवतात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
काय होऊ शकते नुकसान?
युरीन इन्फेक्शन :
कच्च्या कडधान्यात ‘ई. कोलाय’ नावाचा विषाणू तयार होतो. हा शरीरात जाऊन लघवीच्या संसगार्चा धोका निर्माण करतो.
टायफॉईड :
मोड आलेल्या कडधान्यात साल्मोनेला टायफी नामक बॅक्टेरिया तयार होतो. यामुळे टायफॉईड रोग उद्भवतो.
किडनीला धोका :
जास्त प्रमाणात अंकुरित कडधान्य खाल्ल्याने त्यातील लिस्टीरिया नामक बॅक्टेरियाचा तुमच्या किडनीवर वाईट प्रभाव होऊन फूड पॉईझनिंग होऊ शकते.
काय उपाय कराल?
कडधान्य निश्चितच लाभदायक आहेत. मात्र त्यांचे योग्य प्रकारे सेवन करणे आवश्यक आहे. जर आपण नेहमी आहारात मोड आलेले कडधान्याचा वापर करीत असाल तर ते थोडे उकळून घ्या. जर उकळायचे नसेल तर वाफेवरदेखील शिजवू शकता. या क्रियेमुळे बºयाच बॅक्टेरियांचा नायनाट होऊ शकतो.