Health benefits tips how long food stored in fridge are safe for eat | डाळ, भात, चपाती असे पदार्थ कितीवेळपर्यंत फ्रीजमध्ये सुरक्षित राहतात? चांगल्या आरोग्यासाठी वेळीच माहीत करून घ्या

डाळ, भात, चपाती असे पदार्थ कितीवेळपर्यंत फ्रीजमध्ये सुरक्षित राहतात? चांगल्या आरोग्यासाठी वेळीच माहीत करून घ्या

(image Credit -thespruceeats)

अन्न वाया घालवू नये, आपल्याला लागेल तेवढंच जेवण ताटात घ्यायला हवं असं तुम्ही नेहमीत ऐकत आला असाल. ज्या लोकांच्या घरी अन्न उरतं ते नेहमीच फ्रिजमध्ये ठेवतात. जेव्हा वाटेल तेव्हा तेच अन्न गरम करून खातात.  शहारांमध्ये फ्रिजचा वापर उरलेलं अन्न ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण अनेक घरांमध्ये रोजच्या व्यस्त जीवनशैलीत सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच जेवण तयार केले जातं. फ्रिजमध्ये जास्तवेळ अन्न ठेवणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

सगळ्यात आधी तुम्ही शिजवलेले फ्रिजमध्ये ठेवत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.  कच्च्या आणि शिजवलेल्या भाज्या एकाच ठिकाणी ठेवू नका. कारण त्यामुळे कच्च्या भाज्यांमध्ये असलेले बॅक्टेरिया शिजवलेल्या भाज्यांना प्रदूषित करू शकतात. म्हणून शक्यतो भाज्या वेगवेगळ्या ठेवा. त्यानंतर झाकण ठेवा.

प्रतीकात्मक तस्वीर

भात

कोणत्याही प्रकारचे ताजे पदार्थ खाणे चांगले आहे, पण जर तुम्ही जास्त भात शिजविला ​​असेल उरल्यावर ते फ्रीजमध्ये ठेवले असेल तर एक ते दोन दिवसात संपवल्यास चांगलं राहिल. कारण जास्त काळ ठेवलेला भात खाण्याने तुम्हाला त्याचे पौष्टिक घटक मिळणार नाहीत आणि यामुळे तुमची पाचन क्रिया खराब होऊ शकते.  फ्रिजमध्ये ठेवलेला तांदूळ खाण्यापूर्वी ते फ्रिजच्या बाहेर काही काळ ठेवा आणि त्यानंतर गरम करावे. जर त्यामध्ये बॅक्टेरिया अस्तित्वात असतील तर ते मरतील.

चपाती

जर आपण चपाती बनली आणि ती फ्रिजमध्ये ठेवत असाल तर ती उघडे न राहता, म्हणजे भांड्यात झाकून ठेवा. तसेच आपण एक आठवडाभर चपाती  फ्रिजमध्ये ठेवू शकता आणि बाहेर काढून वेळोवेळी खाऊ शकता, परंतु असे केल्याने आपल्या आरोग्यास देखील नुकसान होऊ शकते. बराच वेळ भाकरी, चपाती फ्रिजमध्ये  ठेवल्याने त्याचे पौष्टिक मूल्यही संपते आणि यामुळे आपल्या पोटात दुखू शकते. म्हणून नेहमी ताजी चपाती खाणं उत्तम ठरतं.

डाळी

डाळी पौष्टिक असतात. जर ती ताजी खाल्ली तर शरीराला फायदा होतो. काही लोक डाळ तयार करतात आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात आणि दोन-तीन दिवस तेच खातात. अशा लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवलेल्या डाळीमुळे गॅस होऊ शकतो. म्हणून एका दिवसात डाळ पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करा.

फळं

फळांचा शरीराला जितका फायदा होतो तितकेच चिरलेली फळेदेखील शरीरासाठी हानिकारक असतात. जर तुम्ही चिरलेली पपई रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली असेल तर ६-७ तासांच्या आत संपविणे चांगले आहे कारण त्यानंतर ते दूषित होऊ लागते आणि रोगाचे कारण बनते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही चिरलेला सफरचंद फ्रीजमध्ये ठेवला तर ते शक्य तितक्या लवकर संपविणे चांगले. हे आपल्याला त्यामध्ये उपस्थित जीवनसत्त्वे देईल, ज्याचा शरीराला फायदा होईल.

वाढतं कॉलेस्ट्रॉल, जीवघेण्या आजारांशी लढण्यासाठी फायेदशीर ठरतं हिवाळ्यात बीटाचं सेवन

आपण नियमितपणे खाण्यापिण्याशी संबंधित अशी चूक न करता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण  खराब अन्न विषबाधेचा बळी बनवू शकते. तसंच  तुमची पाचक प्रणाली कमकुवत करते आणि याचा थेट परिणाम तुमच्या रोगप्रतिकारकावर होतो. जर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर शरीर बर्‍याच रोगांनी वेढले जाऊ शकते.

हाडांसाठी घातक ठरतोय वजन कमी करण्याचा 'हा' उपाय; संशोधनातून माहिती समोर

अन्नाची मोठ्या प्रमाणावर होणारी नासडी फार गंभीर मुद्दा आहे. यावर एका सोपा तोडगा डेन्मार्क येथील तज्ज्ञांनी काही वर्षांपूर्वी  सुचवला होता. सामानाची खरेदी करण्यापूर्वी जाणीवपूर्वक फ्रिजमध्ये काय आहे हे तपासा. त्यामुळे अनावश्यक भाज्या आणि सामान आणणे टाळून अन्नाची नासडी होणार नाही. अन्नाची नासडी य समस्येचे विविध भागांत वेगवेगळे परिणाम दिसून येतात. गरीब आणि अविकसित देशांमध्ये अन्ननिर्मितीच्या  प्रक्रियेतच ते वाया जाते. तिथे उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य याला कारणीभूत आहे. त्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे अन्ननिर्मिती व साठवणीचे साहित्य पुरवणे गरजेचे आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health benefits tips how long food stored in fridge are safe for eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.