शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाचा रस पिण्याचे फायदे माहीत असतीलच, आता नुकसानही वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 16:30 IST

Sugarcane Juice Side Effects : ऊसाच्या रसाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे काही साईड इफेक्ट्सही असतात. 

Sugarcane Juice Side Effects : आता उन्हाळ्याला हळूहळू सुरूवात होत आहे. अशात बरेच लोक शरीर थंड ठेवण्यासाठी रोज ऊसाचा रस पितात. ऊसाच्या रसाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे काही साईड इफेक्ट्सही असतात. 

ऊसाच्या रसाचे फायदे

ऊसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटिन, पोटॅशिअम, मिनरल्स, आय़र्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस इत्यादींचा समावेश आहे. हे सगळे पोषक तत्व शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतात. मात्र, हेही तितकंच खरं आहे की ऊसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीराला नुकसानही होतं. एका दिवसात कुणीही दोन ग्लासपेक्षा जास्त ऊसाचा रस पिऊ नये. चला जाणून घेऊन ऊसाचा रस जास्त पिण्याचे नुकसान...

ऊसाच्या रसात जास्त असतात कॅलरी

ऊसाच्या रसामध्ये कॅलरींचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही वजन कमी करत असाल, ऊसाचा रस कमी प्या. एका ग्लास ऊसाच्या रसात जवळपास 250 कॅलरी आणि 100 ग्रॅम शुगर असते. अशात ऊसाचा रस न प्यायल्यास बरं होईल. जेणेकरून वजन कंट्रोलमध्ये राहिल. यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी आणि ग्लायसेमिक लोड जास्त असतो. याने शुगर लेव्हल प्रभावित होते. अशात डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी यापासून दूर रहावं.

पोट होऊ शकतं खराब

जर तुम्ही एका दिवसात ५ ते ५ ग्लास ऊसाचा रस सेवन करत असाल तर तुमची हालत खराब होऊ शकते. यात पोलिकोसनॉल नावाचं तत्व असतं. जे शरीराला नुकसान पोहोचवतं. याने पोट खराब होण्यासोबतच उलटी, चक्कर येणे, इंसोम्नियाचा धोका निर्माण होऊ शकतो.

संक्रमण होण्याचा धोका वाढतो

ऊसाचा रस स्वच्छ ठिकाणीच प्यावा. कारण अस्वच्छता असेल तर माश्या लागतात आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जात नाही. काही ठिकाणी उस व्यवस्थित स्वच्छ न करताही मशीनमध्ये टाकला जातो. याने त्यावर लागलेली  धुळ, माती रसात मिश्रित होते. याने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. 

जास्त वेळ ठेवलेला रस पिऊ नये

अनेक लोक मार्केटमधून ऊसाचा रस आणतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. त्यानंतर 2 ते 3 तासांनी हा रस पितात. हे करणं महागात पडू शकतं. ऊसाचा रस फार लवकर खराब होतो, सोबतचो दूषितही होतो. उसाचा रस तुम्ही 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. जास्त वेळ ठेवला तर तो ऑक्सीडाइज होतो. जास्त वेळ ठेवलेला रस प्यायले तर अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात. नेहमीच फ्रेश ज्यूसचं सेवन करा.

रक्त पातळ होतं साच्या रसाने

जास्त प्रमाणात ऊसाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्त पातळ होऊ शकतं. कारण यात पोलिकोसनॉल असल्याने रक्त पातळ होऊ शकतं. अशात काही कापलं किंवा लागलं तर रक्त येणं बंद होण्यास वेळ लागतो आणि तेवढ्यात खूप रक्त वाहून जातं. जे लोक रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत आहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य