शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लसणाच्या पाण्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, रोज प्याल तर दूर होतील अनेक आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 16:32 IST

Garlic Water Health Benefits: लसणाचं पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. जर लसणाचं रोज एक ग्लास पाणी प्यायलात तर तुम्ही अनेक समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. 

Garlic Water Health Benefits: लसूण फारच फायदेशीर मसाला आहे. त्यात अनेक औषधी गुण आहेत. अनेक आजार दूर करण्यास त्याची मदत होते. तसा तर लसणाचा वापर जास्तीत जास्त लोक भाजीत किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करतात. पण बऱ्याच लोकांना याचे औषधी गुण माहीत नसतात. लसणाचं पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. जर लसणाचं रोज एक ग्लास पाणी प्यायलात तर तुम्ही अनेक समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. 

लसणाचे गुण

लसणामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-वायरल गुण असतात. याने अनेक आजारांपासून बचाव होतो. लसणामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. यात व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 सारखे पोषक तत्वही भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात मॅग्नीज, कॅल्शिअम आणि आयर्नही भरपूर प्रमाणात असतं.

पोटाच्या आजारावर फायदेशीर

लसणाचे पोटासाठी अनेक फायदे होतात आणि लसणाचं पाणी पोटाच्या अनेक समस्या दूर करतं. लसणामुळे पोटदुखी, गॅस, सूज, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासून सुटका मिळते. जर कुणाला पचनासंबंधी काही समस्या झाली असेल तर त्यांनी रोज सकाळी लसणाचं पाणी प्यायला हवं. लसणाचं पाणी प्यायल्याने मासिक पाळी दरम्यान होणारी वेदनाही दूर होते.

हार्टसाठी फायदेशीर

लसणातील तत्व रक्त पातळ करतात. याने ब्लड फ्लो चांगल्याप्रकारे होतो. हृदयाच्या अनेक समस्यांमुळे रक्त घट्ट होणं किंवा रक्त गोठणं अशा समस्या होतात. लसणाचं पाणी प्यायल्याने रक्त पातळ राहतं आणि हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. यात एलिसिन नावाचं तत्व आढळतं. जे हृदयासाठी फायदेशीर असतं. पण हृदयरोगांमध्ये डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असतो.

इम्यूनिटी वाढते

लसणामुळे इम्यूनिटी मजबूत करतो. यात अ‍ॅंटी फंगल, अ‍ॅंटी-व्हायरल आणि अ‍ॅंटी बॅक्टेरिअल गुण असतात. जे आजारांसोबत लढण्यास मदत करतात. लसणाचं पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.

कधी आणि कसं प्यावं?

दोन ग्लास पाण्यात लसणाच्या दोन ते तीन कळ्या टाकून चांगलं उकडून घ्या. पाणी अर्ध होईपर्यंत ते उकडा. अशाप्रकारे लसणाचे सगळे पोषक तत्व पाण्यात उतरतील. टेस्टसाठी या पाण्यात काळे मिरे आणि काळं मीठ टाकून पिऊ शकता. हे पौष्टिक पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणं जास्त फायदेशीर आहे. हे पाणी तुम्ही नाश्ता किंवा जेवणासोबतही पिऊ शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य