शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रात्री कच्चा लसूण खाणं कोणत्या लोकांसाठी ठरतं बेस्ट? या गंभीर आजारांचा टळतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 9:54 AM

Eating Garlic before bed:रात्री झोपण्याआधी कच्चा लसूण खाल्ल्याने काय फायदे होतात हे माहीत आहेत का? कदाचित माहीत नसेल. आज तेच आपण जाणून घेणार आहोत.

Eating Garlic before bed: वेगवेगळ्या आरोग्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी आणि सकाळी पोट चांगलं साफ होण्यासाठी लोक रात्री झोपण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचं सेवन करतात. रात्री तुम्ही जे काही खाता त्यातील गुण रात्रभर आपला प्रभाव शरीरावर पाडतात आणि तुमच्या आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा धोका कमी करतात. लसूण खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहीत असतीलच. बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खातात. पण रात्री झोपण्याआधी कच्चा लसूण खाल्ल्याने काय फायदे होतात हे माहीत आहेत का? कदाचित माहीत नसेल. आज तेच आपण जाणून घेणार आहोत.

हृदयरोगांचा धोका होईल कमी

आजकाल बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे हृदयरोगांचा धोका खूप वाढत चालला आहे. जगभरात हृदयरोगांमुळेच सगळ्यात जास्त जीव जातात. कमी वयाच्या लोकांमध्येही हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर हार्टसंबंधी समस्या सतत वाढत आहेत. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्याआधी लसणाच्या 1 किंवा दोन कळ्या खाऊ शकता. लसणामध्ये आढळणाऱ्या एलिसिन नावाच्या तत्वामुळे हाय ब्लड प्रेशर लेव्हल आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. 

डायजेशन मजबूत होतं

ज्या लोकांचं डायजेस्टिव सिस्टम फार कमजोर होतं आणि ज्यांना नेहमीच अपचन, डायरिया, पोटात गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या होतात त्यांना दिवसभर सुस्ती, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. पचनशक्ती सुधारण्यासाठी लोकांनी रात्री लसणाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर

मधुमेह म्हणजे डायबिटीसच्या आजारात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवणं फार जास्त महत्वाचं असतं. शुगर लेव्हल अनियंत्रित झाल्यास डायबिटीससंबंधी समस्या वाढू शकता किंवा जास्त गंभीर होऊ शकतात. शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक किंवा दोन लसणाच्या कळी खाव्या.

रात्री लसूण खाण्याची पद्धत

कच्चा किंवा भाजलेला लसूण

जर शक्य असेल तर रात्री झोपण्याआधी 1 किंवा दोन लसणाच्या कच्चा कळी चावून खाव्यात. त्यानंतर थोडं पाणी प्यावं. जर तुम्ही कच्चा लसूण खात नसाल तर तूपामध्ये हलक्या भाजलेल्या लसणाच्या एक-दोन कळ्या चावून खाऊ शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHeart Diseaseहृदयरोगdiabetesमधुमेह