शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्सचा खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची पडणार नाही गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:33 IST

तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे फायदे सांगितले तर तुम्ही अधून मधून नाही तर नियमितपणे शेवग्याच्या शेंगाची भाजी  खाल.

अनेकजण आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात. पण या शेंगाचे फायदे फारच कमी लोकांना माहीत असतात. जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी खाण्याचे फायदे सांगितले तर तुम्ही अधून मधून नाही तर नियमितपणे शेवग्याच्या शेंगाची भाजी  खाल. या शेंगांची केवळ खासियत नसून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या याने दूर केल्या जाऊ शकतात. इतकेच काय तर मांस, अंडी आणि दुधापेक्षाही जास्त प्रोटीन तुम्हाला या भाजीतून मिळू शकतं.

शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे. कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. शेवग्याच्या केवळ शेंगाच नाही तर याच्या पानांचा देखील भाजीसाठी वापर केला जातो. 

हाय ब्लड प्रेशर

ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल अशा लोकांनी शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणं फायदेशीर ठरतं. तसेच याने अस्वस्थता, चक्कर येणे आणि उलटी होणे अशाही समस्या दूर होतात.

वाढतं वय कंट्रोल करा

(Image Credit : reportshealthcare.com)

शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. ज्याचा वापर पूर्वीपासून सौदर्यासाठी केला जातो. जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगाचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसणार नाही. तसेच याने डोळ्यांची दृष्टीही चांगली राहते.

कॅल्शिअमचा स्त्रोत

शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. ज्याने तुम्हाला हाडे मजबूत करण्याला मदत मिळते. तसेच दातही मजबूत होतात. म्हणूनच लहान मुलांना या शेंगांची भाजी देणं फायदेशीर मानलं जातं.

लठ्ठपणा कमी करा

लठ्ठपणा आणि शरीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा एक फायदेशीर उपाय मानला जातो. यात फॉस्फोरस भरपूर प्रमाणात आढळतं जे शरीरातील अतिरिक्त कॅलर कमी करतं आणि सोबतच चरबी कमी करून तुमचा लठ्ठपणाही दूर करतं.

रक्त शुद्ध होतं

शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्येदेखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अ‍ॅन्टीबायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अ‍ॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.

रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवतात

शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारतं. 

श्वसनविकारांना कमी करते 

(Image Credit : pennmedicine.org)

घशातील खवखव, कफ, श्वास घेताना त्रास होणे असा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावे. यामधील दाहशामक घटक श्वसनमार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यास मदत करतात. क्षयरोग, ब्रोन्कायटीस, अस्थमा यासारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात.

संसर्गापासून संरक्षण होतं

शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती  सुधारण्यास मदत करतं. तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य