HEALTH : कमी रक्तदाबाने त्रस्त आहात? करा घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 12:25 IST2017-02-15T06:55:57+5:302017-02-15T12:25:57+5:30
कमी रक्तदाबाच्या समस्येवर डॉक्टरांच्या सल्लयाबरोबरच औषधं घेण्यासोबतच काही घरगुती उपायही करता येतात.
.jpg)
HEALTH : कमी रक्तदाबाने त्रस्त आहात? करा घरगुती उपाय !
न ांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब कमी होतो तेव्हा आपणास कमी रक्तदाबाची समस्या सतावते. उच्च रक्तदाबाप्रमाणेच कमी रक्तदाब हा सुद्धा गंभीर विकार आहे. यात जर आपला रक्तदाब ९०/६० किंवा यापेक्षा कमी असेल तर समजावे की आपणास कमी रक्तदाब आहे. ही समस्या असणाऱ्याच्या मेंदूला आणि शरीरातील इतर अवयवांना रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याने भोवळ येणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात.
कशामुळे होतो कमी रक्तदाब
भरपूर घाम आल्याने किंवा जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होणे, उच्च रक्तदाब किंवा इतर आजारांवर घेतली जाणारी औषधं, गंभीर स्वरूपाचा जंतूसंसर्ग, हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणं, गरोदरपणा, मुर्च्छा ही कमी रक्तदाबामागील महत्त्वाची कारणं आहेत.
काय कराल घरगुती उपाय ?
कमी रक्तदाबाच्या समस्येवर डॉक्टरांच्या सल्लयाबरोबरच औषधं घेण्यासोबतच काही घरगुती उपायही करता येतात.
* तुळशीच्या 10 ते 15 पानांचे तुकडे करून एका कपड्यात बांधून ठेवा. सकाळी उठल्यावर ही पानं एक चमचा मधात घालून हे मिश्रण खा. यानी नक्कीच मदत मिळेल.
* 30 ते 32 बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे बेदाणे चावून चावून खा. बेदाणे भिजवलेले पाणीही प्या.
* 7 ते 8 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बदाम सोलून वाटून घ्या. वाटलेले बदाम एक ग्लास दुधात घालून दूध गरम करा. गरम दूध घ्या.