Health Alert : ‘लिक्विड सोप’ वापरताय? सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 14:06 IST2017-04-15T08:36:52+5:302017-04-15T14:06:52+5:30
आपण बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी लिक्विड सोप वापरतो. मात्र अलिकडे केलेल्या एका संशोधनातून आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
.jpg)
Health Alert : ‘लिक्विड सोप’ वापरताय? सावधान !
आपण बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी लिक्विड सोप वापरतो. हे हॅँड जेल हात धुतल्याचं समाधान तर देते मात्र अलिकडे केलेल्या एका संशोधनातून आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या जेलमध्ये ६० टक्के अल्कोहोलचं प्रमाण असतं. याचा जर तुम्ही अधिक प्रमाणात वापर कराल तर त्यामुळे तात्काळ बॅक्टेरिया नष्ट होतात पण यासोबतच यामुळे काही इतर परिणाम देखील होतात.
एका संशोधनानुसार हँड जेल हे हानिकारक ठरू शकते. कारण यात ट्राईकोल्सन असते. त्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतो. शिवाय हँड जेल हे बॅक्टेरिया प्रतिरोधी क्षमता कमी करू शकते. ट्राईकोल्सनमुळे पोट आणि आतड्यामध्ये समस्या होऊ शकते. तसच हँड जेलचा वापर करताना मुलांनी त्याचा वापर काळजीपूर्वक करायला पाहिजे.
हँड जेलचा वापर यशस्वी तेव्हाच ठरतो जेव्हा आपल्याला आपल्या हाताला किती प्रमाणात धूळ आणि माती लागलेली आहे. हातावर असलेले काही विषाणू म्हणजेच न्युरोवायरस आणि सी डिफिसाईल यावर हँड जेल तितकं प्रभावीपणे काम करत नाही. जर हँड जेल प्रभावी ठरत नसला तरी तो पाणी आणि साबणापेक्षा प्रभावी आहे हे नक्की.
बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, हँड जेलची लोकप्रियता प्रत्येक देशात आहे. ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोक महिन्यातून एक वेळा याची खरेदी करतात.