शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:47 IST

पहिल्यांदाच लठ्ठपणाचे प्रमाण कमी वजनाच्या तुलनेत जास्त आढळले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकाराचा धोका वाढतो.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र बाल कोष (युनिसेफ) च्या ताज्या अहवालानुसार, जगभरातील मुलांमध्ये आणि किशोरवयीनांमध्ये आता कमी वजनापेक्षा लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. २०२० ते २०२२ या काळातील आकडेवारीच्या आधारे सादर केलेल्या या अहवालात २०३५ पर्यंत लठ्ठपणा ही गंभीर आरोग्य व आर्थिक समस्या ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. 

पहिल्यांदाच लठ्ठपणाचे प्रमाण कमी वजनाच्या तुलनेत जास्त आढळले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकाराचा धोका वाढतो.

भारतातही वाढती चिंता

भारतातील शहरी भागांमध्ये मुलांमध्ये आणि किशोरवयीनांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच लाल किल्ल्यावरून भाषण करताना लठ्ठपणा हा भविष्यातील मोठा आरोग्यसंकट ठरू शकतो, अशी गंभीर चिंता व्यक्त केली होती.

लठ्ठपणा वाढण्यामागील कारणे

जंक फूड, अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ आणि साखरयुक्त पेयांचे वाढते सेवन

मुलांना आकर्षित करण्यासाठी होणारे आक्रमक डिजिटल आणि दूरदर्शनवरील जाहिराती

शारीरिक हालचालींमध्ये सातत्याने होत असलेली घट

अहवालातील ठळक मुद्दे

वर्ष २००० मध्ये ५ ते १९ वयोगटातील केवळ ३% मुले लठ्ठ होती, तर १३% मुले कमी वजनाची होती.

२०२२ पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण ९.४% पर्यंत वाढले, तर कमी वजनाचे प्रमाण घटून ९.२% झाले.सध्या जगभरातील सुमारे १८८ दशलक्ष मुले लठ्ठपणाने ग्रस्त आहे.

उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया वगळता जवळजवळ सर्व प्रदेशांत लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आहे.

२०३५ पर्यंत लठ्ठपणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दरवर्षी ४ ट्रिलियन डॉलर्सहून अधिकचा बोजा पडू शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग