शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये केस गळतीची समस्या गंभीर, लसीकरण झालेल्यांमध्ये लक्षणं कमी,तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 19:37 IST

नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे.

कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतरही लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे. हा अभ्यास एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या टीमने केला आहे. ज्यात सुमारे १२ डॉक्टर सहभागी होते.

एम्सच्या डॉक्टरांनी कोरोनापासून बरे झालेल्या एकूण १८०१ लोकांचा अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, १३ टक्के लोकांना तीन महिन्यांनंतरही संसर्गाची वेगवेगळी लक्षणे आहेत. यापैकी २८ टक्के लोकांना केस गळण्याची समस्या आहे. या व्यतिरिक्त, कोरोनापासून बरे झालेल्या लोकांमध्ये इतर अनेक लक्षणे देखील आहेत. २५ टक्के लोकांना झोपेचा त्रास होत आहे. २७ टक्के लोक डोकेदुखीची तक्रार करत आहेत, १४ टक्के लोक स्मरणशक्ती कमी झाल्याची तक्रार करत आहेत.

त्वचा रोगाची समस्याकेस गळणे, श्वासोच्छवास आणि थकवा हेच केवळ कोरोनामधून बरे झालेल्या लोकांमध्ये आढळत नाहीत, तर त्वचेशी संबंधित समस्या देखील आढळत आहेत. त्वचेवर लाल रॅशेसची प्रकरणे सात टक्के लोकांमध्ये दिसून आली. बोट आणि अंगठ्याच्या त्वचेचा रंग बदलण्याची समस्या चार टक्के लोकांमध्ये दिसून आली आहे.

लसीचे डोस घेतलेल्या लोकांमध्ये लक्षणे कमीअभ्यासात डॉक्टरांनी सांगितले आहे की, कोरोना लसीचा डोस घेतलेल्यांना ४५ टक्के ही लक्षणे हळूहळू कमी होत आहेत. कोरोनामधून बरे होण्याच्या पहिल्या महिन्यापर्यंत रुग्णांमध्ये लक्षणे खूप तीव्र होती, परंतु लस घेतल्यानंतर ही लक्षणे दोन ते तीन महिन्यांत कमी झाली आहेत.

ही लक्षणे देखील दिसू लागली७९ टक्के लोकांमध्ये अशक्तपणा२५ टक्के लोकांना श्वास घेण्यास त्रास१८ टक्के लोकांचे वजन कमी होते३.११ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या

काळजी घेणे महत्वाचेडॉक्टरांच्या मते, बाहेर जाताना डोके उन्हात झाकून ठेवा. हे आपल्या केसांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आणि प्रदूषणापासून वाचवेल. केसांना पुन्हा पुन्हा स्पर्श करणे टाळा. त्यांना तेल लावा आणि दररोज केस विंचरा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या