उशीरा उठताय? तर मधुमेहच तुमची झोप उडवेल...पाहा कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 05:14 PM2021-05-13T17:14:58+5:302021-05-13T17:17:49+5:30

आयुर्वेदात पण असं म्हटलं गेलंय की उशीरा उठण्याचे फार तोटे असतात. त्यामुळे अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो. आता हे नुकत्याच झालेल्या अभ्यासातूनही समेर आलं आहे की लवकर उठणाऱ्या लोकांना मधुमेहाचा धोका कमी असतो.

Getting up late invite diabetes...see how | उशीरा उठताय? तर मधुमेहच तुमची झोप उडवेल...पाहा कारणं

उशीरा उठताय? तर मधुमेहच तुमची झोप उडवेल...पाहा कारणं

Next

लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे.  आपल्या मुलांना आपण नेहमी हे शिकवतो. मात्र, बऱ्याचदा मोठी माणसंही लवकर उठत नाहीत. अशा लोकांना मधुमेहाचा धोका फार मोठ्या प्रमाणात असतो. असे का होते हे जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही केला आहेत का? याचे उत्तम आम्ही तुम्हाला देतो.

आयुर्वेदात पण असं म्हटलं गेलंय की उशीरा उठण्याचे फार तोटे असतात. त्यामुळे अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो. आता हे नुकत्याच झालेल्या अभ्यासातूनही समेर आलं आहे की लवकर उठणाऱ्या लोकांना मधुमेहाचा धोका कमी असतो.

इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ नैपल्स फेडरिको सेकेंड या विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चनुसार लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांमध्ये जे लोक रात्री लवकर झोपून लवकर उठतात त्यांच्यामध्ये टाईप २ डायबेटीजचा धोका कमी असतो. यासाठी १७२ लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासाअंती समोर आले की,

लवकर झोपून लवकर उठणाऱ्या लोकांमध्ये उशीरा झोपून उशीरा उठणाऱ्यांच्या तुलनेत तेमधुमेहाचा धोका हा ६ पटीने कमी होता. तेच उशीरा झोपून उशीरा उठणाऱ्यांना इतरही आजारांचा धोका ४ पटीने जास्त होता.

याच युनिव्हरसिटीच्या वैज्ञानिकांनी आधी केलेल्या अभ्यासानुसार हा उशीरा उठणाऱ्यांमध्ये मधुमेहाची लक्षणं फार मोठ्या प्रमाणात आढळली होती. तसेच रात्री फार उशीरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांमध्ये अपचन, मानसिक तणाव, कमी रोगप्रतिकारक शक्ती इत्यादी समस्या आढळल्या होत्या.

मधुमेहाची लक्षणं

घसा कोरडा पडणे
मधुमेहाचं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे तुमचा घसा सतत कोरडा पडतो. तुम्हाला तहान लागत राहते. अशी लक्षण तुम्हाला दिसत असतील तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

सतत लघवीला होणे
मधूमेहाचं दुसरं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे सतत लघवी होणे. रात्रीच्या वेळी अथवा दिवसाही तुम्हाला सतत लघवी होत असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे.

थकवा येणे
मधुमेह असणाऱ्या लोकांना थकवा फार लवकर येतो तसेच ही लोक सतत जांभई देतात.

धुसर दिसणे
मधुमेहाचा परीणाम दृष्टीवरही होतो. यामुळे धुसर दिसण्याची शक्यता असते.

छोट्या जखमा भरण्यास वेळ लागणे
मधुमेहाचं आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे जखमा लवकर बऱ्या होत नाहीत आणि शरीरावर पुरळ येते.

Web Title: Getting up late invite diabetes...see how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.