(Image credit : Glamour Fame)
'गॅस' सोडत नसेल असा जगात कोणताही प्राणी नाही. सगळेच आपल्या शरीरातील अनावश्यक गॅस बाहेर काढतात. अनेकांना तर गॅसची मोठी समस्या असते. तर काहींच्या गॅसची फारच दुर्गंधी येते. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना एकप्रकारे शिक्षाच भोगावी लागते. पण आता या समस्येवर एक उपाय शोधण्यात आला आहे.
मिरर डॉट को डॉट यूके ने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या एका कंपनीने दावा केला आहे की, त्यांनी एक असं औषध तयार केलंय, ज्याने गॅसचा दुर्गंध नाही तर सुगंध येईल. त्यांनी एक अशी टॅबलेट तयार केली आहे, ज्याने गॅसचा दुर्गंध सुगंधात बदलेल. म्हणजेच दुसऱ्यांचा त्रास वाचणार.
ही टॅबलेट क्रिस्टियन पोंचेवल नावाच्या एका वैज्ञानिकाने विकसित केली आहे. हा वैज्ञानिक फ्रान्सच्या पश्चिम भागातील शहरात राहतो. क्रिस्टियनने दावा केला आहे की, तो तुमच्याद्वारे सोडल्या जाणाऱ्या गॅसला गुलाब किंवा चॉकलेटचा सुगंध देऊ शकतो.
क्रिस्टियन पोंचेवल हे २००७ पासून अशाप्रकारची टॅबलेट विकसित करत आहेत. तसेच त्यांनी ही टॅबलेट विकण्यासाठी एक वेबसाइटही तयार केली आहे. वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे की, ही टॅबलेट पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यांच्या या टॅबलेटमध्ये चिकित्सा किंवा औषधाच्या आधारावर काहीही नाही.
वेबसाइटने दावा केला आहे की, ही टॅबलेट मोठ्या अभ्यासानंतर आणि परिक्षणांनंतर तयार करण्यात आली आहे. ही टॅबलेट २००७ पासूनच विकली जात आहे. तसेच या टॅबलेटची वाढती मागणी हे स्पष्ट करते की, या टॅबलेटचा ट्रेन्ड आहे.
काही वर्षांपूर्वी क्रिस्टियन पोंचेवलने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते काही मित्रांसोबत एका डिनर पार्टीला गेले असताना त्यांना या टॅबलेटची आयडिया आली होती. जेवण करताना त्यांनी दुर्गंधी येणारी गॅस सोडल्याने तिथे बसणंही कठीण झालं होतं. त्यानंतर त्यांनी लुटिन मलिक नावाची कंपनी सुरू केली आणि ही टॅबलेट तयार करणे सुरू केले.