मोफत आरोग्य तपासणी
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
शेवगाव : सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या शेवगाव येथील धन्वंतरी फौंडेशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचा जवळपास ३०० अधिकारी, कर्मचार्यांनी लाभ घेतला.
मोफत आरोग्य तपासणी
शेवगाव : सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या शेवगाव येथील धन्वंतरी फौंडेशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचा जवळपास ३०० अधिकारी, कर्मचार्यांनी लाभ घेतला.शासन व जनता यांच्यात दुवा साधणारी यंत्रणा म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. शासकीय कर्मचार्यांचे आरोग्य व शरीर संपदा सुदृढ असली तर हे कर्मचारी जनतेची कामे उत्कृष्टपणाने पार पाडतील. याकरिता महसूल कर्मचार्यांच्या मोफत आरोग्य तपासणीचा हा उपक्रम इतरांना स्फूर्ती, प्रेरणा देणार्या पद्धतीचा असल्याचा गौरव प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी यावेळी केला. डॉ.संजय लड्डा, डॉ.मनिषा लड्डा, आहारतज्ज्ञ डॉ.मोनिका पाटील, डॉ.अजय साबळे, डॉ.किरण वाघ आदींनी कर्मचार्यांची आरोग्य तपासणी केली. या मोहिमेत तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मंडलाधिकारी, कामगार तलाठी, कोतवाल आदी जवळपास ३०० कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तहसीलदार हरिष सोनार यांनी धन्वंतरी फौंडेशनच्या मोहिमेचे कौतुक केले. यावेळी प्रांताधिकारी कावरे यांच्या हस्ते गुणवंत महसूल अधिकारी, कर्मचारी, निवासी नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घाडगे, टंचाई विभागाचे अरुण दळे, लिपिक अशोक नरोडे, मंडळाधिकारी अशोक चौरे, कोतवाल संजय खरड, कामगार तलाठी प्रीती मनाळ, शिंपले यांचा गुणवंत अधिकारी, कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.