शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणात वायरल इन्फेक्शनपासून कसा कराल बचाव? जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 12:21 IST

Viral Infection : यांपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामुळे वायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळेल आणि इम्यूनिटी बूस्ट होईल.

Viral Infection : बदलत्या वातावरणात वायरल इन्फेक्शनचा धोका वाढत असतो. सामान्यपणे वातावरणात होत असलेल्या बदलामुळे व्हायरस अ‍ॅक्टिव होतात. हे व्हायरस नाक, घशात, फुप्फुसात आणि छातीत प्रवेश करतात आणि काही तासांमध्य शरीराला संक्रमित करतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप येतो.

त्यामुळे सतत बदलत असलेल्या वातावरणात वायरल इन्फेक्शनचा धोका नियंत्रित करण्यासाठी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार यांपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामुळे वायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळेल आणि इम्यूनिटी बूस्ट होईल.

लसूण

लसणाच्या सेवनाने तुमचा वायरल इन्फेक्शनसहीत अनेक आजारांपासून बचाव होतो. लसणांमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी वायरल आणि अ‍ॅंटी फंगल तत्व असतात. जे वेगवेगळ्या संक्रमणासोबत लढण्यास मदत करतात. यातील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी फंगल प्रॉपर्टीज आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात.

मध आणि आले

मध आणि आल्याचं सेवन केल्याने तुम्हाला वायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळते. आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे कोल्ड आणि फ्लूपासून बचाव करण्यासोबतच घशातील खवखवही दूर करतात. मधामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअम आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. जे संक्रमण रोखण्यास आणि इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात.

तुळशी आणि काळे मिरे

काळे मिरे आणि तुळशीचं सेवन केल्याने संक्रमणासोबत लढण्यास मदत मिळते. तुळशीने आपल्या शरीराची इम्यूनिटी वाढते ज्यामुळे वायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. याने कोल्ड आणि कफही दूर होतो. काळ्या मिऱ्यांमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी बायोटीक गुण असतात. याने इम्यूनिटी बूस्ट होते.

आवळा

आवळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. हिवाळ्यात याचा डाएटमध्ये समावेश करणं चांगलं असतं. याने इम्यूनिटी वाढण्यासोबतच डायजेशनही सुधारतं. तसेच वायरल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

हळद

कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी हळदीचं सेवन रामबाण उपाय ठरतं. यात अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात. इन्फेक्शनसोबत लढल्यावर इम्यूनिटी मजबूत होते आणि वायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य