शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे शुगर क्रेविंग? सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 15:35 IST

हेल्दी राहण्यासाठी योग्य डाएट घेण्याचा अनेकदा सल्लाही देण्यात येतो. त्याचबरोबर मीठ, कमी साखर आणि कमी तेलाचे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु काही लोकांना सतत गोड पदार्थ खात रहावं असं वाटत असतं.

हेल्दी राहण्यासाठी योग्य डाएट घेण्याचा अनेकदा सल्लाही देण्यात येतो. त्याचबरोबर मीठ, कमी साखर आणि कमी तेलाचे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु काही लोकांना सतत गोड पदार्थ खात रहावं असं वाटत असतं. अनेकदा तर ही लोक इच्छा नसतानाही भरपूर  गोड पदार्थ खातात. अशी लोकं शुगर क्रेविंगची शिकार असतात. तुम्हालाही शुगर क्रेविंग होत असेल तर या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकता. 

जेव्हा तुम्ही फार तणावात असता त्यावेळी तुम्हाला सर्वात जास्त जंक फूड आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. 

साखर कमी खाण्यासोबतच तुम्ही या गोष्टीवरही लक्ष देणं गरजेचं असतं की तुम्ही कोणतं पेय पित आहात. अनेकदा तुम्ही हेल्दी समजून एखाद फ्रुट ज्यूस किंवा कोल्ड ड्रिंक घेता. परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आणि शक्रोज असतं. त्यासाठी पॅकेटबंद फ्रुट ज्यूस, स्पोर्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा सोडा असलेल्या पेयांऐवजी नारळाचं पाणी आणि घरच्या घरी तयार करण्यात आलेली पेयं घ्या. मोठ्या प्रमाणात हेल्दी फॅट्सचा आहारामध्ये समावेश करावा. हेल्दी फॅट्स शरीरातील सूज कमी करण्यासोबतच तुमचं पोट भरण्याचंही काम करतात. याप्रकारे तुम्हाला जंक फूड किंवा साखर खाण्याची इच्छा कमी होईल. हेल्दी फॅट्स म्हणून ऑलिव्ह ऑइल, पीनट बटर, सीकॉड ऑइल आणि फ्लैक्सीडसारख्या पदार्थांचा समावेश करावा. 

जास्त वेळ उपाशी राहू नका. स्नॅक्स खात असाल तर त्यामध्ये हेल्दी स्नॅक्सचा समावेश करा. त्यामुळे तुमचं मेटाबॉलिज्म नीट राखण्यास मदत करतं. तुम्ही ग्रीन टी, फळं, ब्लॅक कॉफी, मल्टीग्रेन, बिस्किट, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. 

तुम्हाला वर्कआउट करणंही फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्ही भावनात्मक तणावापासून दूर राहता. त्याचप्रमाणे यामुळे तुमचे फॅट्स कमी होऊन शरीरातील साखरंचं प्रमाणंही नियंत्रित राहते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य