शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 10:46 IST

वेगवेगळ्या कारणांनी महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक बघायला मिळते. याला जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे, हार्मोन्स असंतुलन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अशी वेगवेगळी कारणे आहेत.

वेगवेगळ्या कारणांनी महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक बघायला मिळते. याला जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे, हार्मोन्स असंतुलन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अशी वेगवेगळी कारणे आहेत. काही महिलांमध्ये कंबर आणि मांड्यांचा भाग जास्त जाड असतो. अशात या महिलांनी फिटनेस रूटीन आणि डाएट फॉलो करणं गरजेचं असतं.

(Image Credit : womansday.com)

त्यासाठी तुमच्या पचनक्रियेचं काम फॅट एकत्र करण्यासोबतच फॅट्स नष्ट करण्यासाठी गरजेचं असतं. अशातच तुम्ही दररोज एका तासासाठी नियमितपणे एक्सरसाइज करणं आवश्यक असतं. अशातच महिलांसाठी एक त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार केलेला वर्कआउट प्लॅन किंवा रोटेशनल डाएट प्लॅन असणं अत्यंत फायदेशीर ठरतो. 

नियमित योगाभ्यास 

(Image Credit ; self.com)

योगाभ्यास शरीराचं अतिरिक्त वजन आणि चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. तुम्ही धनुरासन, नौकासन, भुजंगासन, पवन मुक्तासन करा. हे सर्व हिप्स आणि मांड्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतं. शवासन आणि काही मिनिटांसाठी प्राणायाम करा. लठ्ठ महिलांना योगाभ्यास करताना सावधपणे करणं गरजेचं असतं. अन्यथा नुकसान पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही एक्सरसाइज किंवा योगाभ्यास करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

कार्डियो एक्सरसाइज

(Image Credit ; self.com)

लठ्ठ महिलांनी वजन कमी करण्यासाठी आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्डियो करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये वेगाने चालणं, काही मिनिटांसाठी स्ट्रेचिंग करणं आणि खांदे, गळा, पाठ यांना मजबुत करणाऱ्या एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. स्पॉट जॉगिंग, मानेचे व्यायाम, खांदे गोलाकार फिरवणं, पायांचे अंगठे पकडणं यांसारख्या एक्सरसाइज स्नायू बळकट करण्यासाठी मदत करतात.

प्रत्येक आठवड्यात 5 ते 6 वेळा 45 मिनिटांसाठी हाय स्पीड ऐरोबिक वर्कआउट करा. यामुळे तुम्हाला स्टॅमिना, शरीर लवचिक होणं आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत मिळेल. नियमितपणे कार्डियो एक्सरसाइज केल्याने या बॉडि टाइपमुळे होणाऱ्या शारीरिक समस्या जसं हायपरटेंशन, डायबिटीस, हृदयरोग आणि ऑस्टिओपोरोसिस इत्यादी अगदी सहज कमी करणं शक्य होतं.

काय खाणं ठरतं फायदेशीर?

लठ्ठ शरीरयष्टी असणाऱ्या महिलांनी जेवणामध्ये जवळपास 30 टक्के कॉम्पलेक्स कार्ब्स, 45 टक्के प्रोटीन आणि 25 टक्के गुड फॅट्सचा समावे करणं फायदेशीर ठरतं. एकाचवेळी जास्त जेवण करू नका. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खा. तुमचा असा समज होऊ शकतो की, उपाशी राहिल्याने वजन कमी होतं. तर हा तुमचा गैरसमज आहे. उपाशी राहिल्याने आणखी वजन वाढतं. त्यामुळे प्रत्येक दोन ते तीन तासांनी काहीना काही हेल्दी खा.

काय खाणं टाळावं?

वजन जास्त असलेल्या महिलांनी आपल्या आहारामध्ये अधिक पौष्टिक आणि कमी फॅट्सचा समावेश करा. फॅट्स वाढवणारे हाय कॅलरी फूड्स आणि साखरेचे अधिक प्रमाण असणारे फूड प्रोडक्ट्स खाणं शक्यतो टाळावं. सर्व प्रकारची शुगर (केळी, आंबा, द्राक्षं यांसारख्या फळांमध्ये असणारी साखर) आणि कार्ब्स म्हणजेच, पिठापासून तयार करण्यात आलेले प्रोडक्ट्स, पास्त, तांदूळ आणि बटाटा खाण्यापासून दूर राहा. हे काही असे खाद्यपदार्थ आहेत. जे अत्यंत वेगाने ब्लड शुगर लेव्हल वाढते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. )

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स