शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गरम पाणी, सिगारेट किंवा चहा कशानंही पोट साफ होत नाहीये? 'या' भाज्या खाऊन लगेच व्हाल हलके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:41 IST

Constipation Home Remedies : पोट साफ झालं नाही तर कशातही मन लागत नाही आणि पोटासंबंधी इतरही समस्या होतात. बद्धकोष्ठतेची समस्या झाल्यावर पोट जड होतं, गॅस तयार होता आणि टॉयलेटला गेल्यावर वेदना होतात.

Constipation Home Remedies : पोट साफ न होणे म्हणजे बद्धकोष्ठता ही एक कॉमन समस्या आहे. कोणत्याही वयाच्या लोकांना ही समस्या होऊ शकते. आतड्या योग्यपणे काम करत नसल्यावर ही समस्या होते. पोट साफ झालं नाही तर कशातही मन लागत नाही आणि पोटासंबंधी इतरही समस्या होतात. बद्धकोष्ठतेची समस्या झाल्यावर पोट जड होतं, गॅस तयार होता आणि टॉयलेटला गेल्यावर वेदना होतात.

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, ही समस्या दूर करण्यासाठी फायबर फार महत्वाचं असतं. फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यानं विष्ठा मुलायम होते आणि पोट सहजपणे साफ होतं. तसेच आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरियाही वाढतात.

फायबर कशातून मिळवाल?

खाण्याच्या भरपूर गोष्टींमध्ये फायबर असतं. जास्त प्रमाणात फायबर मिळवण्यासाठी काही भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. फायबर असलेल्या भाज्या खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. चला जाणून घेऊ कोणत्या भाज्या ठरतात फायदेशीर...

हिरवे मटार

हिरव्या मटारमध्ये ५.७ ग्रॅम फायबर असतं. हिरव्या मटारमध्ये फायबर आणि प्लांट प्रोटीन भरपूर असतं. यानं पचन चांगलं होण्यास मदत मिळते, ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आवश्यक पोषक तत्व मिळतात. नियमितपणे हे खाल्ल्यास पोट साफ न होण्याची समस्या होणार नाही.

फुलकोबी

फुलकोबीमध्ये २ ग्रॅम फायबर असतं. फुलकोबी एक कमी कॅलरी असलेली भाजी आहे, ज्यात भरपूर फायबर असतं. यानं पचनास मदत होते आणि पोट भरलेलं राहतं. वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास ही भाजी खूप मदत करते. तसेच यातून व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेट्सही भरपूर मिळतात.

पालक

पालक भाजीमध्येही भरपूर प्रमाणात फायबर असतं. पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर भाजी आहे. ही भाजी पचन संतुलित ठेवते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवते. या भाजीतून भरपूर प्रमाणात आयर्न सुद्धा मिळतं. यात अनके व्हिटॅमिन्स, खनिज आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या नेहमीच होत असेल तर पालक खाऊ शकता.

ब्रोकली

ब्रोकलीमध्येही भरपूर प्रमाणात फायबर असतं. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. या भाजीनं पचन चांगल्याप्रकारे होण्यास मदत मिळते. आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया वाढतात. तसेच आतड्यांवरील सूज कमी होते आणि वजनही कमी होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य