शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सारखी तहान लागतेय?...असू शकतो हा गंभीर आजार!व्हा वेळीच सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 20:41 IST

तुम्हाला सतत तहान लागते का? दरवेळी ही तहान उन्हाळ्यामुळे लागत असेल असेच काही नाही. तहान लागण्याची अन्य कारणेही असू शकतात. ही कारणे काहीवेळा आजार असू शकतात तर एखाद्या आजाराची लक्षणेही असू शकतात.

उन्हाळ्याच्या दिवसात तहानेने जीव व्याकूळ होऊन जातो. सतत पाणी पित रहावेसे वाटते. पण तुम्हाला सतत तहान लागते का? दरवेळी ही तहान उन्हाळ्यामुळे लागत असेल असेच काही नाही. तहान लागण्याची अन्य कारणेही असू शकतात. ही कारणे काहीवेळा आजार असू शकतात तर एखाद्या आजाराची लक्षणेही असू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा व जाणून घ्या तहान लागणे नेमके कशामुळे असू शकते...डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्युजच्या संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनूसार खालील त्रास संभावतात.

मधुमेहमधुमेह किंवा डायबेटीज असताना रक्तातील वाढलेली साखर मुत्रावाटे बाहेर फेकली जाते. यामुळे सतत युरीन होत राहते. याचा परीणाम म्हणजे शरीरातील पाणी कमी कमी होत जाते व सतत तहान लागत राहते. त्यामुळे तुम्हाला जर सतत तहान लागत असेल तर हा डायबेटीजचा धोकाही असू शकतो.

पॉलीडिस्पियाजर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पाणी पित असाल तर तुम्हाला पॉलीडिस्पिया हा आजार असू शकतो. या आजारात सतत तहान लागते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी पोटात जाते. यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते. यामुळे तुम्हाला मळमळ, उलट्या अशी लक्षणं जाणवू शकतात. तसेच तुम्हाला सतत युरिनही होऊ शकते.

डिहायड्रेशनची लक्षणेतुम्हाला हा त्रास उन्हाळ्यात जास्त जाणवेल. सतत तहान लागणं हे डिहायड्रेशनचं लक्षणही असू शकतं. तुमच्या शरीरात तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवते. अशावेळी तुम्हाला घसा सतत कोरडा पडणे, थकवा वाटणे अशी लक्षणं दिसू शकतात. जुलाब, हिटव्हेव, फुड पॉयझनिंग, ताप, जळजळ यामुळेही डिहायड्रेशन होऊ शकते. यावर योग्य प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रॉल देऊन पाण्याची समस्या दूर होऊ शकते.

उपाय काय?डॉ. मुल्तानी यांच्या मते यावर नक्कीच उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे एकाचवेळी भरपूर पाणी पिऊ नये. तुम्ही आवळा आणि मधाचे मिश्रण खाऊ शकता तसेच भिजवलेली बडिशेप वाटून खाऊ शकता. जर जास्तच त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरला संपर्क साधणेच योग्य.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी