झोपताना श्वास घेण्याच्या मार्गात काही समस्या झाल्यावर अचानक जेव्हा तुमची झोप उघडते, या समस्येला स्लिप एप्निया असं म्हणतात. स्लिप एप्निया एक असा आजार आहे ज्यात रात्री झोपेत श्वास घेण्यात अडचण होते आणि घोरण्याची समस्याही होते. घोरण्याच्या आवाजाने बाजूला झोपलेल्या माणसाची झोपही खराब होते. अशात अभ्यासकांना एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, ज्या लोकांना स्लिप एप्निया आहे ते लोक रात्री झोपताना चेहऱ्यावर मास्क लावतील तर त्यांच्या ऊर्जेचा स्तर आणि जीवनशक्तीमध्ये सुधारणा करू शकतात. या फेस मास्कला सीपीएपी मशीनही म्हटलं जातं. हा मास्क सध्या अशाच लोकांना दिला जातो, ज्यांची स्लिप एप्नियाची समस्या गंभीर झाली आहे.
कुणाला प्रभावित करतो स्लिप एप्निया?
हा रिसर्च द लान्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. या रिसर्चमध्ये अभ्यासासाठी इंपिरिअल कॉलेज लंडन येथील अभ्यासकांनी ब्रिटनच्या ११ राष्ट्रीय आरोग्य सेवा स्लिप सेंटरमधील २०० पेक्षा अधिक लोकांना सहभागी करून घेतले होते.
रिसर्चच्या मुख्य लेखिका मॅरी मोरेल म्हणाल्या की, 'आम्ही स्लिप एप्निया आणि याच्या वाढत्या रूग्णांची संख्या बघत आहोत. पूर्वी सामान्यपण ही समस्या जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये अधिक बघायला मिळत होती. आता याचा प्रभाव मेनोपॉज स्थितीतील महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलांवरही होतांना दिसतोय'.
१ अब्ज लोक आहेत प्रभावित
मोरेल म्हणाल्या की, 'स्लिप एप्नियाच्या सर्वच केसेसपैकी जवळपास ६० टक्के केसेस हलक्या स्वरूपात विभागल्या जातात, पण आतापर्यंत आम्हाला हे माहीत नव्हतं की, सीपीएपी या रूग्णांसाठी फायदेशीर ठरेल किंवा नाही'. स्लिप एप्निया जगभरात १ अब्जपेक्षा अधिक लोकांना प्रभावित करतो. यानेच लोकांना घोरण्याची समस्या होते'.
कसा असतो हा मास्क?
अभ्यासकांनुसार, या समस्येवर उपचार करण्यासाठी मास्क आहे. हा मास्क नाक किंवा तोंडावर बसवला जातो. याला निरंतर सकारात्मक वायुमार्ग दबाव मशीन असंही बोललं जातं. यात श्वास घेण्याचा मार्ग मोकळा ठेवत हळूहळू तोंड आणि घशात हवा सरकवली जाते.
रिसर्चमध्ये ११५ रूग्णांना ३ महिन्यांसाठी सीपीएपीचा वापर करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. ज्यात त्यांना स्लिप एप्निया केसेसमध्ये बरीच सुधारणा बघायला मिळाली. अभ्यासकांनी सीपीएपीचा वापर करणाऱ्या रूग्णांमध्ये थकवा, तणाव, सामाजिक आणि भावनात्मक यासोबत इतरही अनेक गोष्टींमध्ये सुधारणा दिसली.