शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

उपवासाच्या आधी व्यायाम करा, होतील अधिक फायदे, संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:48 IST

'उपवासाच्या आधी व्यायाम (Exercise) केल्यास उपवासामुळे आरोग्याला मिळणारे फायदे आणखी वाढतात.' अमेरिकेच्या ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या (Brigham Young University) या अभ्यासाचे निष्कर्ष 'मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज'मध्ये (Medicine and science in sports and exercise) प्रसिद्ध झाले आहेत.

अनेक जण उपवास (Fasting) करतात. परंतु उपवास करण्यापूर्वी भरपूर खावं आणि उपवास करताना श्रम करू नये, अशीच उपवासाची अनेकांची संकल्पना असते. तुम्हीदेखील तसाच विचार करीत असाल, तर नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे तुमचं मत बदलू शकतं. या अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे, की 'उपवासाच्या आधी व्यायाम (Exercise) केल्यास उपवासामुळे आरोग्याला मिळणारे फायदे आणखी वाढतात.' अमेरिकेच्या ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या (Brigham Young University) या अभ्यासाचे निष्कर्ष 'मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज'मध्ये (Medicine and science in sports and exercise) प्रसिद्ध झाले आहेत.

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे संशोधक लँडन डेरू (Landon Deru) यांनी सांगितलं, की 'उपवासाच्या वेळी व्यायामामुळे मेटाबॉलिझम प्रक्रियेत बदल होऊ शकतो का, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. जेव्हा शरीरातल्या ग्लुकोजचं प्रमाण संपतं, तेव्हा शरीरात कीटॉसिसची (ketosis) प्रक्रिया सुरू होते. यानंतर, शरीराच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी शरीरात आधीच जमा झालेल्या चरबीचं विखंडन (Fragmentation) सुरू होतं आणि या रासायनिक प्रक्रियेत बायप्रॉडक्टच्या रूपात कीटोन्स तयार होतात. मेंदू आणि हृदयासाठी निरोगी ऊर्जास्रोत असण्यासोबतच कीटोन्स कॅन्सर, पार्किन्सन्स आणि अल्झायमरसारख्या आजारांशी लढण्यासाठीदेखील उपयुक्त आहेत.'

असं केलं संशोधनसंशोधकांनी हा अभ्यास करीत असताना 20 निरोगी व्यक्तींना केवळ पाणी पिऊन 36-36 तास उपवास करण्यास सांगितलं. दोन्ही उपवास पुरेसं जेवण जेवल्यानंतर सुरू करण्यात आले होते. पहिला उपवास कोणत्याही व्यायामाशिवाय सुरू झाला, तर दुसऱ्या उपवासाची सुरुवात ट्रेडमिल वर्कआउटने झाली. या वीस जणांचे उपवास सुरू असताना ते जागे असताना प्रत्येक दोन तासांनी त्यांच्या मनःस्थितीचं मूल्यांकन केलं गेलं. त्यांच्या बी-हायड्रॉक्सीब्युटाइरेट (बीएचबी) पातळीचीदेखील नोंद केली गेली. हे कीटोनसारखं रसायन आहे.

व्यायामामुळे खूप फरक जाणवलाजेव्हा त्यांनी व्यायाम करण्यासह उपवास सुरू केला, तेव्हा कीटॉसिसची प्रक्रिया सरासरी तीन ते साडेतीन तास आधी सुरू झाली. तसंच त्यांच्यामध्ये ४३ टक्के जास्त बीएचबी तयार झालं. यामागचा सामान्य सिद्धांत असा आहे, की व्यायामामुळे शरीरातलं ग्लुकोज योग्य प्रमाणात बर्न होतं. त्यामुळे कीटॉसिसच्या संक्रमणास गती मिळते. व्यायाम न करणार्‍यांमध्ये २० ते २४ तासांनंतर कीटॉसिसची प्रक्रिया सुरू होते.

या संशोधनाचे सह-लेखक ब्रूस बेली (Bruce W Bailey) म्हणतात, 'उपवास सुरू असतानाचा २० ते २४ तासांचा वेळ खूप कठीण असतो. अशा परिस्थितीत उपवास २४ तासांपूर्वी सोडता यावा. पण आरोग्याला होणारे फायदे सारखेच असावेत, यासाठी काय करता येईल, असा प्रश्न उपस्थित होत होता. यासाठी 24 तासांचा उपवास व्यायामासोबत सुरू करता येईल. पण यासाठी काही सावधगिरी बाळगणंदेखील आवश्यक आहे.'

बेली पुढे म्हणाले, की 'तुम्ही भरपूर अन्न खाल्ल्यानंतर व्यायाम करून उपवास सुरू केलात, तर तुमच्यामध्ये कीटॉसिसची प्रक्रिया अनेक दिवस सुरू होत नाही. त्यामुळे उपवास सुरू करण्यापूर्वी मध्यम आहार घेणं आवश्यक आहे.'

हे लक्षात ठेवाटाइप 1 मधुमेह किंवा इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करू नये, अन्यथा 24 तास उपवास करणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं; पण जे निरोगी आहेत, त्यांनी आठवड्यातून एकदा तरी 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त उपवास करावा. स्वत:ला सुरक्षित ठेवताना तुम्ही जितक्या जास्त कॅलरीज बर्न कराल तितक्या वेगाने कीटॉसिसची प्रक्रिया सुरू होईल आणि उपवासाचे तुम्हाला अधिक फायदे मिळतील. याचाच अर्थ उपवासाच्या वेळी काम करत राहणं चांगलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह