शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
4
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
5
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
6
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
7
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
8
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
10
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
11
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
12
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
13
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
14
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
15
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
16
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
17
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
18
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
19
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
20
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

Excessive Sweating: जास्त घाम येणं हा आहे अनेक गंभीर आजारांचा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:20 IST

Excessive Sweating : तुम्हालाही काहीच कारण नसताना खूप घाम येत असेल तर त्याकडे करू नका दुर्लक्ष. कारण हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो.

तुम्ही अशा लोकांपैकी आहात का ज्यांना जास्त घाम येतो? केवळ ५ मिनिटांच्या ट्रेडमिल वर्कआउटनंतर तुम्ही घामाने चिंब भिजता का? कुणाला हॅंडशेक करण्याआधी तुमच्या हाताला घाम (Excessive Sweating)  येतो? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर ही एक सामान्य समस्या समजून याकडे दुर्लक्ष करू नका. कारण फार जास्त घाम येणे एखाद्या गंभीर आजाराचा संकेतही असू शकतो. जास्त घाम येण्याच्या समस्येला मेडिकल भाषेत हायपरहायड्रोसिस (Hyperhidrosis) असं म्हटलं जातं.

कारण नसताना येऊ लागतो घाम

अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटॉलजीशी संबंधित डर्मेटॉलॉजिस्ट बेंजामिन बारान्किन सांगतात की, 'जास्तीत जास्त वेळी हा फरक करणं अवघड असतं की, त्यांना सामान्यपणे घाम येतोय की एखाद्या कारणाने वा आजारामुळे येतोय. घाम येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही गरम वातावरणात असता, फिजिकल अॅक्टिविट करता, स्ट्रेसमध्ये असता किंवा भीतीचा सामना करता तेव्हा तुम्हाला घाम सामान्य बाब आहे. पण हायपरहायड्रोसिस म्हणजे अधिक जास्त घाम येणे ही समस्या लोकांना ते थंड वातवरणात असताना, कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी न करता, किंवा कोणत्याही कारणाशिवाय घाम येतो. कोणत्याही कारणाशिवाय त्यांना इतरांपेक्षा जास्त घाम येतो'. (हे पण वाचा : सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा)

अमेरिकी हेल्थ वेसबाइट  webmd.com नुसार, अनेक आजार किंवा मेडिकल कंडिशनमुळे जास्त घाम येण्याची समस्या होऊ शकते. जसे की, 

- मेनोपॉज 

-  थायरॉइड - जेव्हा एखाद्या व्यक्तीला हायपोथायरॉयडिज्मची समस्या होते. त्यांचं शरीर उष्णतेप्रति अधिक संवेदनशील होतं. त्यामुळे त्यांना अधिक घाम येतो.

- डायबिटीस - जे लोक इन्सुलिन किंवा डायबिटीसचं औषध घेतात त्यांच्या शरीरात अनेकदा ब्लड ग्लूकोजचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी अधिक घाम येतो. ग्लूकोजची लेव्हल सामान्य झाली  की, घाम येत नाही.

- हार्ट फेल्युअर - अचानक खूप घाम येणं हा हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर किंवा हार्टसंबंधी इतर आजाराचा संकेत असू शकतो. हार्ट अटॅक आल्यावर केवळ घाम येणार नाही तर छातीतही दुखेल. इतरही काही लक्षणे दिसतील.

- दारूची प्यायची सवय - अल्कोहोल  शरीराचं नर्वस सिस्टीम, सर्कुलर सिस्टीमसहीत  इतरही काही भागांना प्रभावित करते. फार जास्त दारू प्यायल्याने हार्ट रेट वाढतो आणि यामुळेही अधिक घाम येण्याची समस्या होते.

- रूमेटाइड आर्थरायटिस - हा एक ऑटोइम्यून आजार आहे. ज्यात हाडांच्या जॉइंटमध्ये इन्फ्लेमेशन होऊ लागतं. या आजाराने पीडित लोकांना रात्रीच्या वेळी अधिक घाम येतो.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग