शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

स्वच्छतेची खूप काळजी घेता, मग तुमच्या बाळात जन्मजात दोष आढळतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:25 IST

पर्सनल हायजिन, घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही शाम्पू, कंडिशनर्स, डिटर्जन्ट्स हॅण्ड वॉश.. वापरता? - बाप रे!

ठळक मुद्देडिटर्जन्ट्समधील केमिकल्समुळे आरोग्यावर होतो दुष्परिणामबाळांवर होऊ शकतो दुष्परिणामस्वच्छता ठेवा, पण अतिरेक नकोपर्सनल हायजिनवरही ठेवा लक्ष

- मयूर पठाडेस्वच्छतेची आवड कोणाला नसते? त्यातही घरातल्या गृहिणी तर कायम स्वच्छतेच्याच मागे लागलेल्या असतात, मग ती घराची स्वच्छता असो, नाहीतर शरीराची. त्यापासून काही विकार होऊ नयेत, यासाठी ही दक्षता आवश्यकही आहे, पण त्याचा अतिरेक झाला तर? त्याचा परिणाम तुमच्या होणाºया बाळावर होऊ शकतो आणि त्याच्यात काही जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात.स्वत:च्या शरीराच्या आणि घराच्या स्वच्छतेसाठी आपण रोज घरात काय काय वापरतो?शाम्पू, कंडिशनर्स, डिटर्जन्ट्स, पर्सनल हायजिन, कीटकनाशकांसाठी वेगवेगळे क्लिनर्स, हॅँड वॉश, फूड प्रिझरवेटिव्हज, लॉँड्री प्रॉडक्ट्स, आय ड्रॉप्स, याशिवाय इतरही अनेक पर्सनल केअर प्रॉडक्ट्स.. इतकंच नाही, अनेक जण पोहोण्यासाठी म्हणून स्विमिंग पूलवर जातात, तिथेही पाण्याच्या स्वच्छतेसाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो..

पण या साºयाचा आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे?अमेरिकेतली व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात अलीकडेच एक मोठं संशोधन केलं. त्यातून त्यांच्या हाती आलेले निष्कर्ष आपल्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत.संशोधकांनी हे सारे प्रयोग मुख्यत: केले ते उंदरांवर. जे जे उंदिर या साºयाच्या संपर्कात आले, त्यांच्या पुढच्या पिढीत जन्मजात दोष आढळून आले. शास्त्रज्ञांचं तर असंही निरीक्षण आहे, की हे पदार्थ त्यांच्या शरीरात जाणं किंवा त्यांनी त्याचं सेवन करणं, या गोष्टी तर खूप दूर, ज्या घरात, ज्या रुममध्ये या गोष्टी अधिक प्रमाणात आहेत, त्याच्या नुसत्या संपर्कानंही त्यांच्या पुढच्या पिढीत हे जन्मजात दोष दिसून आले.शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, या केमिकल डिटर्जन्ट्सच्या संपर्कामुळे जे दुष्परिणाम उंदरांवर दिसून आले, तसेच परिणाम माणसावरही होऊ शकतात. माणसं तर त्याच्या आणखी जास्त संपर्कात असतात.घरात पती आणि पत्नी या दोघांपैकी कोणता जोडीदार या डिटर्जन्ट्सच्या जास्त संपर्कात येतो, की दोन्ही जण येतात यावरही तुमच्या बाळात किती जन्मजात दोष असू शकतील हे अवलंबून असतं.त्यामुळे संशोधकांचं म्हणणं आहे, घराची आणि वैयक्तिक स्वच्छता तर प्रत्येकानं ठेवलीच पाहिजे, त्याला काहीच पर्याय नाही, नाहीतर अनारोग्याला आमंत्रण मिळेल, पण हे करीत असताना तुम्ही काय आणि कसला उपयोग करता, हेदेखील तपासून पाहा. केमिकल्स आणि डिटर्जन्ट्सचा अतिरेकी वापर टाळा आणि आपल्या बाळालाही त्यापासून वाचवा. आपली भावी पिढी जर आपल्याला सशक्त हवी असेल तर या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील...